Ancient Handprints | 1,800 वर्षांपूर्वीच्या प्लास्टरवरील मानवी हाताचे ठसे! pudhari File Photo
विश्वसंचार

Ancient Handprints | 1,800 वर्षांपूर्वीच्या प्लास्टरवरील मानवी हाताचे ठसे!

पुढारी वृत्तसेवा

लंडन : सुमारे 1,800 वर्षांपूर्वी रोमन ब्रिटनमध्ये लोक मृतदेहांना दफन करण्यासाठी तयार करताना त्यांच्यावर प्लास्टरसारखी पेस्ट (लेप) लावत असत, ज्यामुळे आजही स्पष्ट दिसणारे हाताचे ठसे मागे राहिले आहेत, असे संशोधकांनी अलीकडील एका ब्लॉग पोस्टमध्ये सांगितले आहे.

पुरातत्त्वशास्त्रज्ञांच्या मते, हे नव्याने सापडलेले ठसे इसवी सनाच्या तिसर्‍या आणि चौथ्या शतकातील दफनविधीच्या कामामध्ये मृतदेहांना स्पर्श करून तयारी करण्याच्या पद्धतीवर प्रकाश टाकतात. युनिव्हर्सिटी ऑफ यॉर्क येथील ‘सीईंग द डेड’ प्रकल्पाशी संबंधित संशोधकांची ही टीम, रोमन साम्राज्याच्या काळात यॉर्कशायरमध्ये राहणार्‍या लोकांच्या दगडी आणि शिसाच्या शवपेट्या भरण्यासाठी द्रव जिप्सम वापरण्याच्या रहस्यमय पद्धतीचा अभ्यास करत आहे.

जिप्सम हे कॅल्शियम-आधारित खनिज आहे, जे प्राचीन प्लास्टर आणि सिमेंटमधील एक महत्त्वाचा घटक होता. उष्णता दिल्यावर आणि पाण्यात मिसळल्यावर जिप्सम एक ओतण्यायोग्य द्रव बनते, ज्याला कधी कधी प्लास्टर ऑफ पॅरिस म्हणतात. हा जाड द्रव मृतदेहावर ओतल्यावर तो कठीण प्लास्टरमध्ये रूपांतरित होतो आणि मृत व्यक्तीचे आवरण किंवा ठसा मागे सोडतो, अगदी पॉम्पेई येथील साच्यांप्रमाणे. यॉर्कशायर परिसरात आजपर्यंत जिप्सममध्ये दफन केलेले किमान 45 मृतदेह सापडले आहेत.

त्यापैकी एका मृतदेहाचा अभ्यास करताना ही दगडी शवपेटी 1870 च्या दशकात सापडली होती आणि तिचा यापूर्वी योग्य अभ्यास झाला नव्हता. टीमने द्रव जिप्सम लावण्याच्या पद्धतीचा एक आश्चर्यकारक पुरावा शोधला: कोणीतरी ते हाताने पसरवले होते. ‘जेव्हा आम्ही आवरण उचलले आणि साफसफाई करून 3डी स्कॅनिंग सुरू केले, तेव्हा आम्हाला बोटे असलेले हाताचे ठसे सापडले आणि आम्ही आश्चर्यचकित झालो, ‘असे युनिव्हर्सिटी ऑफ यॉर्क येथील रोमन पुरातत्त्वशास्त्रज्ञ आणि ‘सीईंग द डेड’ प्रकल्पाच्या मुख्य संशोधक मॉरीन कॅरोल यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT