Ancient silver bowl Pudhari
विश्वसंचार

Ancient silver bowl: 1800 वर्षांपूर्वीचा चांदीचा सुंदर कटोरा

इतिहासाच्या पाऊलखुणा शोधताना अनेकदा अशा कलाकृती समोर येतात, ज्या केवळ त्यांच्या सौंदर्यानेच नव्हे, तर त्यांच्यामागील गौरवशाली इतिहासाने आपल्याला थक्क करतात

पुढारी वृत्तसेवा

लंडन : इतिहासाच्या पाऊलखुणा शोधताना अनेकदा अशा कलाकृती समोर येतात, ज्या केवळ त्यांच्या सौंदर्यानेच नव्हे, तर त्यांच्यामागील गौरवशाली इतिहासाने आपल्याला थक्क करतात. असाच एक अनमोल ठेवा म्हणजे ‌‘सिल्व्हर फ्लॅन्ज्ड‌’ कटोरा. मोत्यांसारख्या नक्षीने सजलेला हा चांदीचा कटोरा सध्या लंडनमधील ‌‘बिटिश म्युझियम‌’चे मुख्य आकर्षण ठरत आहे.

हा कटोरा चौथ्या शतकातील (सुमारे 1800 वर्षांपूर्वीचा) मानला जातो. हा तो काळ होता जेव्हा बिटनवर रोमन सामाज्याचा मोठा प्रभाव होता. या काळात स्थानिक बिटिश संस्कृती आणि रोमन जीवनशैली यांचा सुरेख संगम झाला होता. त्या काळी चांदीची भांडी बाळगणे हे केवळ गरजेपुरते मर्यादित नसून, ते सामाजिक प्रतिष्ठा आणि चैनीचे प्रतीक मानले जात असे. या कटोऱ्याची सर्वात मोठी खासियत म्हणजे त्याची ‌‘फ्लॅन्ज्ड‌’ बनावट. या कटोऱ्याच्या वरच्या बाजूला बाहेरच्या दिशेने पसरलेली एक रुंद कडा आहे. ही डिझाईन दिसायला आकर्षक तर आहेच, शिवाय कटोरा पकडण्यासाठी आणि तो संतुलित ठेवण्यासाठीही उपयुक्त आहे. या कडेवर मोत्यांसारखी अतिशय बारीक आणि अचूक नक्षी कोरण्यात आली आहे. त्या काळातील कारागिरांचे तांत्रिक कौशल्य किती प्रगत होते, याचे हे एक उत्तम उदाहरण आहे. चौथ्या शतकात आजच्यासारखी प्रगत यंत्रे नव्हती.

तरीही कारागीर केवळ हाताने या भांड्यांना आकार देत असत: चांदीचा पत्रा : सर्वात आधी शुद्ध चांदीचा पातळ पत्रा तयार केला जाई. हातोड्याचा वापर : कारागीर हातोड्याने ठोकून या पत्र्याला कटोऱ्याचा योग्य आकार देत. कलाकुसर : आकार मिळाल्यानंतर कडांवर बारीक सजावटीचे काम केले जात असे आणि शेवटी एका खास पॉलिशने भांड्याला चकाकी दिली जात असे. ही भांडी दैनंदिन वापरासाठी नव्हती. चांदीचे हे कटोरे श्रीमंत वर्गातील मेजवान्यांची शोभा वाढवत असत. अनेकदा धार्मिक विधी, खास भेटवस्तू किंवा संग््राहणीय वस्तू म्हणून यांचा वापर केला जात असे. आज हा कटोरा प्राचीन काळातील प्रगत धातुकलेचा पुरावा म्हणून जगासमोर उभा आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT