Pakistani Influencer Wedding | अवघ्या १७ वर्षांच्या पाकिस्तानी इन्फ्लुएंसरने केला निकाह  
विश्वसंचार

Pakistani Influencer Wedding | अवघ्या १७ वर्षांच्या पाकिस्तानी इन्फ्लुएंसरने केला निकाह

सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया

पुढारी वृत्तसेवा

इस्लामाबाद : पाकिस्तानचा १७ वर्षांचा प्रसिद्ध कंटेंट क्रिएटर 'रियल अझान' याने आपल्या चाहत्यांना एक मोठा धक्का दिला आहे. या अल्पवयीन कंटेंट क्रिएटरने अचानक निकाह (लग्न) केल्यामुळे सध्या इंटरनेटवर त्याची जोरदार चर्चा सुरू आहे. अझानने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर निकाहचा एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यानंतर सोशल मीडियावर यूजर्सनी विविध प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. एकीकडे अझानचे चाहते त्याला या नवीन आयुष्यासाठी शुभेच्छा देत आहेत, तर दुसरीकडे इतक्या कमी वयात लग्न करण्याच्या त्याच्या निर्णयावर अनेक जण प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत.

लग्नाच्या या खास प्रसंगी नववधू आणि नवऱ्या मुलाने पांढऱ्या रंगाचे मॅचिंग कपडे परिधान केले होते. बाहुला-बाहुलीचे लग्न असावे अशा पद्धतीने दोघे एकत्र बसलेले दिसत होते. अर्थातच दोघेही बाहुला-बाहुलीप्रमाणेच 'क्यूट'ही दिसत होते; पण खरोखरच हे लग्न लागले असेल तर ते योग्य नाही, अशी प्रतिक्रिया अनेकांनी दिली. इतक्या लहान मुलीचे एखाद्या अल्पवयीन मुलाशी लग्न लावणे हे अनेकांसाठी धक्कादायकच होते.

निकाहनंतर या जोडप्याने कॅमेऱ्यासमोर अनेक रोमँटिक पोज दिल्या, ज्यामध्ये नवरी मुलगी थोडी लाजत असताना दिसली. याशिवाय या कपलच्या मेहंदीचे फोटोही समोर आले आहेत. लहान वयात लग्न करण्याच्या अझानच्या निर्णयामुळे अनेक नेटिझन्स संतापले असून, त्यांनी अझानच्या पालकांच्या भूमिकेवरही तीव्र शब्दांत आक्षेप घेतला आहे. एका प्रसिद्ध कंटेंट क्रिएटरने अल्पवयात चिमुरड्या मुलीशी लग्न केल्यामुळे समाजात चुकीचा संदेश जातो, असे अनेकांनी म्हटले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT