विश्वसंचार

‘या’ गावातील सर्व लोक आहेत विस्मृतीचे शिकार!

Pudhari News

पॅरिस : फ्रान्समध्ये डाक्स नावाचे एक छोटेसे गाव आहे. तेथे स्वयंसेवक वगळता अन्य सर्व म्हणजे 105 लोक विस्मृतीशी संबंधित अल्झायमर्सचे शिकार आहेत. त्यामुळे या गावाला 'अल्झायमर गाव' असेही म्हटले जाते. उतार वयात होणार्‍या अल्झायमर्स या मेंदूच्या विकारामुळे कोणतीही गोष्ट लक्षात राहत नाही. आजार बळावल्यावर मनुष्य अगदी  स्वतःचे नाव व जवळच्या नातेवाईकांनाही विसरतो. तरीही या गावात अशा लोकांचे दैनंदिन जीवन सुकर बनवण्यात आले आहे.

सरकार, स्थानिक प्रशासन व काही स्वयंसेवी लोकांनी हे गाव वसवले आहे. तिथे राहणारे अल्झायमर्सचे रुग्ण निराशेच्या गर्तेत राहून नव्हे तर आनंदाने जीवन जगतात. या गावात अशा लोकांसाठी खास किराणा व फळांची दुकाने, कॅफे, ग्रंथालय आणि म्युझिकरूम आहे. तेथील रुग्णांच्या देखभालीसाठी परिचारिकाही आहेत; पण त्या सामान्य वेशात असतात. त्यामुळे रुग्णांना आपण रुग्णालयात आहोत असे वाटत नाही व खुल्या, नैसर्गिक वातावरणात ते आयुष्य जगतात. यावर्षीच जूनमध्ये हे गाव वसवण्यात आले. गावात राहण्यासाठी आलेली पहिली व्यक्ती म्हणजे 82 वर्षांच्या मॅडेलिन एलिसाल्डे. त्यांनी सांगितले की हे संपूर्ण गाव मला माझ्या घरासारखेच आहे. याठिकाणी आमची चांगली देखभाल केली जाते. या गावातील रुग्ण आत्मनिर्भर बनून जीवन जगतात हे विशेष!

 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT