10-Inch Robots | इशाऱ्यांवर बसणारे, उठणारे आणि झोपणारे १० इंचांचे चिमुकले रोबो  
विश्वसंचार

10-Inch Robots | इशाऱ्यांवर बसणारे, उठणारे आणि झोपणारे १० इंचांचे चिमुकले रोबो

पुढारी वृत्तसेवा

सॅन होझे : प्रसिद्ध टेक कंपनी ‘एनव्हिडिया’ने (NVIDIA) तंत्रज्ञान विश्वात पुन्हा एकदा आपल्या नावीन्यपूर्ण प्रयोगाने सर्वांना थक्क केले आहे. कंपनीच्या एका महत्त्वाच्या कार्यक्रमात CEO जेन्सन हुआंग यांनी अवघ्या १० इंचांच्या छोट्या रोबोंचे थेट सादरीकरण केले. हे छोटेखानी रोबो हुआंग यांच्या केवळ इशाऱ्यांवर उठणे, बसणे आणि अगदी झोपण्याच्या हालचालीही अचूकपणे करताना दिसले. हुआंग यांच्या या प्रात्यक्षिकाने उपस्थितांची मने जिंकली.

कार्यक्रमादरम्यान जेव्हा जेन्सन हुआंग मंचावर भाषण देत होते, तेव्हा हे छोटे आणि आकर्षक डिझाईन असलेले रोबो त्यांच्यासोबत चालताना दिसले. हुआंग यांनी हात वर करताच रोबो ताठ उभे राहिले, हात खाली करण्याचा इशारा करताच ते शांतपणे खाली बसले आणि विश्रांतीचा आदेश मिळताच झोपी गेल्याचे नाटक करू लागले. या रोबोंची हालचाल अत्यंत लवचिक आणि नैसर्गिक भासत होती. हे छोटे रोबो केवळ खेळणे नसून त्यामागे एनव्हिडियाचे प्रगत एआय मॉडेल्स आणि अत्यंत सक्षम मायक्रोचिप्स कार्यरत आहेत.

हे रोबो मानवी भाषा, हातांचे हावभाव आणि परिसरातील अडथळे समजून घेऊन त्यानुसार सेकंदाच्या काही भागांत प्रतिक्रिया देतात. या प्रात्यक्षिकाद्वारे एनव्हिडियाने हे स्पष्ट केले आहे की, कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आता केवळ संगणकाच्या पडद्यापुरती मर्यादित राहिलेली नसून ती प्रत्यक्ष जगात भौतिक रूप घेत आहे. उद्योग, वैद्यकीय क्षेत्र आणि दैनंदिन घरगुती कामांमध्ये अशा प्रकारच्या स्मार्ट आणि लहान रोबोंचा वापर येत्या काळात वेगाने वाढणार असल्याचे संकेत या सादरीकरणातून मिळाले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT