Virat Kohli 
Latest

Virat Kohli : टी-२० विश्वचषकात ‘हा’ विक्रम रचण्यापासून विराट कोहली २७ धावा दूर; जाणूयात त्या विक्रमाबद्दल…

Shambhuraj Pachindre

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीचा रन मशिन विराट कोहली (Virat Kohli) टी-२० विश्वचषकात चांगल्याच लयीत आहे. विराटने पाकिस्तान आणि नेदरलँड्सविरुद्धच्या सामन्यात शानदार अर्धशतके साजरे करणारा कोहली टी-२० विश्वचषकात विक्रम रचण्यापासून एक पाऊल मागे आहे. 'युनिव्हर्स बॉस' म्हणून ओळखला जाणाऱ्या ख्रिस गेललाही विराटने मागे टाकले आहे. नक्की कोणता विक्रम रचण्यापासून किंग कोहली पाठीमागे आहे ते पाहूयात…

भारत आणि नेदरलँड्स यांच्यात झालेल्या सामन्यात भारताने नेदरलँड्वर ५६ धावांनी विजय मिळवला. सामन्यात कोहलीने जबरदस्त फटकेबाजी करत ३७ चेंडूत अर्धशतकी खेळी केली. तर पाकिस्तानविरूध्दच्या सामन्यात विराटने आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्तम फलंदाजी करत ५३ चेंडूत ८२ धावा केल्या होत्या. या दोन्ही सामन्यात अर्धशतकी खेळी करून कोहली नाबाद राहिला होता हे विशेष. विराट टी-२० विश्वचषक २०२२ च्या दोन सामन्यात अर्धशतकी खेळी केल्यामुळे सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये यादीमध्ये दुसऱ्या स्थानी पोहोचला आहे. (Virat Kohli)

त्याने वेस्ट इंडिजचा अनुभवी खेळाडू ख्रिस गेल यालाही मागे टाकले आहे. विराटने आतापर्यंत टी-२० विश्वचषकामध्ये २३ सामने खेळले आहेत, त्यातील २१ डावांमध्ये मिळून त्याने ९८९ धावा केल्या आहेत. १ हजार धावांचा आकडा पार करण्यापासून तो ११ धावा दूर आहे. टी-२० विश्वचषकामध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम श्रीलंकेचा माजी कर्णधार आणि अनुभवी फलंदाज महेला जयवर्धने याच्या नावावर आहे. त्याने टी-२० विश्वचषकांच्या ३१ सामन्यांमध्ये १०१६ धावा केल्या आहेत. जयवर्धनेचा हा विक्रम आपल्या नावावर करण्यापासून विराट कोहली २७ धावा दूर आहे. रविवारी (दि.३०) होणाऱ्या द. आफ्रिकेविरूध्दच्या सामन्यात विराट हा विक्रम आपल्या नावावर करू शकतो.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT