Virat Kohli : विराट कोहलीची धक्कादायक घोषणा! कर्णधारपद सोडण्याचे केले जाहीर 
Latest

Virat Kohli : विराट कोहलीची धक्कादायक घोषणा! कर्णधारपद सोडण्याचे केले जाहीर

रणजित गायकवाड

मुंबई, पुढारी ऑनलाईन : Virat Kohli : भारतीय क्रिकेट संघाच्या तिन्ही फॉरमॅटचा कर्णधार विराट कोहलीने आज क्रिकेट चाहत्यांना धक्का दिला. त्याने टीम इंडियाचे कर्णधार पद सोडण्याचा निर्णय घेत या पदावरून पायउतार होण्याची घोषणा केली आहे.

बराच काळ त्याच्या कर्णधार पदावरून भारतीय क्रिकेट वर्तुळात चर्चा होती. काही दिवसांपूर्वी असे वृत्त आले होते की, टी -२० विश्वचषक संपल्यानंतर तो या स्वरूपाच्या कर्णधारपदावरून पायउतार होईल. अखेर आज गुरुवारी (दि. १६), संध्याकाळी त्याने सोशल मीडियाद्वारे मी टीम इंडियाचे कर्णधार पद सोडणार असल्याची माहिती दिली.

विराटच्या या घोषणेनंतर तो तिन्ही प्रकारच्या क्रिकेट संघाचे कर्णधार पद सोडणार आहे का? अशी चर्चा सोशल मीडियावर रंगल्याचे पहायला मिळत आहे. पण त्याने स्वत: याबाबत एक महत्त्वाचा खुलासा केला आहे.

विराटने आपण टी-२० विश्वचसक स्पर्धेनंतर टी-२० संघाचे कर्णधार पद सोडणार असल्याचे म्हटले आहे. पण तो कसोटी आणि एकदिवसीय संघाच्या कर्णधार पदी कायम राहणार आहे असंही त्यानं सांगितले आहे.

विराटने टी-२० संघाचे कर्णधारपद सोडल्यानंतर आता रोहित शर्माला या फॉरमॅटमध्ये संघाची कमान सोपवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

विराटच्या जागी बऱ्याच दिवसांपासून त्याला या फॉरमॅटमध्ये कर्णधार बनवण्याची मागणी होत होती. विराट कोहलीने आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, 'मला फक्त भारताचे प्रतिनिधित्व करायचे नाही तर भारतीय क्रिकेट संघाचे माझ्या सर्वोत्तम क्षमतेवर नेतृत्व करायचे आहे. मी भाग्यवान आहे. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार म्हणून माझ्या प्रवासात ज्यांनी मला पाठिंबा दिला त्या सर्वांचे मी आभार मानतो. त्यांच्याशिवाय मी हे करू शकलो नाही. टीमचे खेळाडू, सपोर्ट स्टाफ, निवड समिती, माझे प्रशिक्षक आणि प्रत्येक भारतीय ज्याने आमच्यासाठी प्रार्थना केली.'

टी-२० संघाच्या कर्णधार पदावरून पायउतार होणे या निर्णयापर्यंत पोहोचायला बराच वेळ गेला. माझ्या जवळच्या, रवी शास्त्री भाई आणि रोहित जे नेतृत्व गटाचा एक अनिवार्य भाग आहेत, यांच्याशी चर्चा केल्यानंतर, ऑक्टोबरमध्ये दुबईत झालेल्या या टी २० विश्वचषकानंतर या फॉरमॅटच्या संघाचे कर्णधारपद सोडण्याचे ठरवले आहे. मी सचिव जय शाह आणि बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांच्यासह सर्व निवडकर्त्यांशी याबद्दल बोललो आहे. मी माझ्या सर्वोत्तम क्षमतेनुसार भारतीय क्रिकेट आणि भारतीय संघाची सेवा करत राहीन.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT