पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहली मागील काही दिवस मैदानावर फलंदाजी करताना चाचपडत आहे. सध्या खराब फाॅर्मचा सामना करणारा विराटचा सोशल मीडियावरील दबदबा कायम राहिला आहे. इंस्टाग्राम यांचे फॉलो अर्सची संख्या ( virat kohli followers ) तब्बल २० कोटी (200 मिलियन) इतकी झाली आहे. अशी कामगिरी करणारा तो पहिला क्रिकेटर बनला आहे. आजपर्यंत भारताचा सर्वात लोकप्रिय क्रिकेटर अशी ओळख असणारा महेंद्रसिंह धोनी आणि भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा यांनाही अशी कामगिरी करता आलेली नाही.
आता इंस्टाग्रामवर सर्वाधिक फॉलोअर्स असणारा विराट हा जगातील तिसरा खेळाडू झाला आहे. इंस्टाग्रामवर सर्वाधिक फॉलोअर्स हे पोर्तुगालचा स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो याचे आहेत. तर दुसर्या स्थानी अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी हा आहे.
ख्रिस्तियानो रोनाल्डो याचे इंस्टाग्रामवर ४५. १ कोटी ( ४५१ मिलियन) फॉलोअर्स आहेत. ४० कोटी फॉलोअर्सचा असणारा हा जागातील एकमेव खेळाडू आहे. लिओनेल मेस्सी यांचे ३३.४ कोटी (३३४ मिलियन ) फॉलोअर्स आहेत.
जगातील क्रिकेटपटूमध्ये इंस्टाग्रामवर सर्वाधिक फॉलोअर्स असणारा विराट हा जगातील पहिला खेळाडू ठरला आहे. आता २० कोटी फॉलोअर्स पूर्ण झाल्यानंतर त्याने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरुन एक विशेष व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओच्या माध्यमातून त्याने जगभरातील आपल्या फॅन्सचे आभार मानले आहेत.