Viral video : Desi Jugaad 
Latest

मानलं, काय डाेकं चालवलं… ‘नाे’ ऐवजी ‘पे पार्किंग’ म्‍हणताच बाईक झाल्‍या गायब ! ( व्‍हिडीओ )

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन डेस्क :  'अगर सीधी उंगली से घी न निकले, तो उंगली टेढ़ी कर लेनी चाहिए'. हिंदीतील ही  म्हण तुम्‍ही वारंवार ऐकली असेल. याच म्हणीपासून प्रेरित झालेल्या एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. इंटरनेट युजर्सही व्हिडीओ पाहिल्यानंतर त्या व्यक्तीचे मनापासून कौतुक करताना दिसत आहेत.

व्हिडीओमध्ये एक व्यक्ती आपल्या घरा समाेरील गेटसमाेर हाेत असलेल्‍या दुचाकींच्‍या पार्किंगमुळे त्रस्‍त आहे.  'नो पार्किंगचा बोर्ड लावल्यानंतरही, लोक त्याच्या दारात वाहने लावणे कमी करत नाहीत. त्याचा हा त्रास कमी होण्याचे नावच घेत नव्हता. दरम्यान, संबंधिताच्‍या मित्राने यावर नामी शक्‍कल लढवली आणि या प्रश्‍नावर ताेडगा काढला.

अनेक वेळा पोस्टर्स किंवा भिंतींवर 'नो पार्किंग' असे लिहिलेले असूनही लोक त्याकडे दुर्लक्ष करतात आणि मनमानीपणे आपली वाहने त्याठीकाणी लावतात. अशा लोकांना अक्कल शिकवणारा हा व्हिडीओ आजकाल इंटरनेटवर सर्वांच्या पसंतीस पडत आहे. व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये घरासमोर 'नो पार्किंग झोन' असे लिहिलेले असूनही, लोक त्याठीकाणीच आपली  दुचाकी पार्क करून जातात, म्हणून बोर्डवर 'नो पार्किंग झोन' ऐवजी  " पार्किंग झोन २५० /- रूपये " असे लिहण्यात आले आहे.

लोकांच्या या मनमानी कारभारामुळे त्या घरात राहणारे लोकही खूप त्रस्थ झाले होते. दरम्यान, एका व्यक्तीने त्या घरातील लोकांच्या समस्यांवर एक 'जुगाड' शोधून काढला. त्याने घरासमोरील फलकावर 'नो पार्किंग झोन ', ऐवजी 'पार्किंग झोन, रु.250/-' असे लिहिले. यानंतर त्या ठिकाणी दुचाकी पार्क करणे सोडा साधा एखादा पक्षीपण मारला गेला नाही.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्वीटर वर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ आयपीएस अधिकारी दीपाशु काबरा यांनी शेअर केला आहे. व्हिडीओ शेअर करताना त्यांनी कॅप्शनमध्ये लिहले आहे की, " यांसारख्या स्थानिक समस्येवर अशा पातळीवरच उपाययोजना करणे शक्य आहे ". हा व्हिडिओ इंटरनेटवर खूप पाहिला आणि शेअर केला जात आहे. या व्हिडिओला आतापर्यंत ६४ हजार व्ह्यूज मिळाले आहेत. त्याचबरोबर नेटकरी यावर मजेशीर कमेंटही करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT