पुढारी ऑनलाईन डेस्क : Vinesh Phogat Medal Case Updates : भारतीय कुस्तीपटू विनेश फोगाटला पदक मिळणार की नाही, यावर आता CAS (कोर्ट ऑफ आर्बिट्रेशन फॉर स्पोर्टस)मध्ये सुनावणी सुरू झाली आहे. CAS च्या एडहॉक डिव्हिजनने विनेश फोगाटच्या प्रकरणी अर्ज स्विकारला आहे. ऑलिम्पिकमध्ये अपात्र ठरल्यानंतर विनेशने भावूक होऊन निवृत्तीचा निर्णय घेतला होता. ऑस्ट्रेलियन न्यायाधीश या प्रकरणात मध्यस्थी करत आहेत. ऑलिम्पिक संपण्यापूर्वी याबाबत निर्णय होऊ शकतो. पॅरिस ऑलिम्पिक 11 ऑगस्ट रोजी संपत आहे.
मी कोणतीही फसवणूक केली नाही
शरीराच्या नैसर्गिक पुनर्प्राप्ती प्रक्रियेमुळे माझे वजन वाढले.
शरीराची काळजी घेणे हा खेळाडूचा मूलभूत अधिकार आहे.
स्पर्धेच्या पहिल्या दिवशी माझ्या शरीराचे वजन निर्धारित मर्यादेत होते.
वजन वाढणे केवळ माझ्या पुनर्प्राप्ती प्रक्रियेचा एक भाग म्हणून झाले, जी फसवणूक नाही.
विनेश फोगाटच्या प्रकरणी सीएएसने एक प्रेस रिलीज जारी केले आणि या प्रकरणाशी संबंधित एक मोठे अपडेट दिले गेले. विनेशची याचिका सीएएस ओजी 24/17 (CAS OG 24/17) अंतर्गत विनेश फोगट विरुद्ध युनायटेड वर्ल्ड रेसलिंग (UWW) आणि आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती (IOC) म्हणून नोंदवण्यात आला आहे. सीएएसने सांगितले की, या प्रकरणात विनेश फोगटने 7 ऑगस्ट 2024 रोजी भारतीय वेळेनुसार रात्री 8:15 वाजता अर्ज दिला होता. यामध्ये विनेशने तिला अंतिम फेरीत प्रवेश मिळावा आणि तिला सुवर्णपदक स्पर्धेसाठी पात्र मानले जावे, अशी विनंती केली होती.
विनेश फोगाट पॅरिस ऑलिम्पिकमध्ये 50 किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीतून अपात्र ठरली होती. सुवर्णपदकाच्या लढतीच्या दिवशी सकाळी तिचे वजन 50.1 किलो होते. पात्रतेच्या निकषांपेक्षा तिचे वजन 100 ग्रॅम होते. फोगटची अपात्रता ही प्रत्येक भारतीयासाठी एक मोठा धक्का होता. सुवर्णपदकाच्या एका रात्री अगोदर विनेशने उपांत्य फेरीनंतर मिळवलेले 2.7 किलो वजन कमी करण्यासाठी सराव केला. भारताचे मुख्य वैद्यकीय अधिकारी दिनशॉ पार्डीवाला यांनी स्पष्ट केले की,. पॅरिसच्या उष्णतेमध्ये सौनामध्ये वेळ घालवण्यासाठी विनेशने वजन कमी करण्यासाठी अथक परिश्रम केले होते. जेव्हा सर्व काही अयशस्वी झाले, तेव्हा प्रशिक्षकांनी तिचे केस कापण्याचा प्रयत्न केला; परंतु तरीही वजन 50 किलोग्रॅमपर्यंत पोहोचू शकले नाही. यामुळे अखेर तिला पॅरिस ऑलिम्पिकमधून अपात्र ठरवण्यात आले.