Pregnancy file photo
व्हिडिओ गॅलरी

Pregnancy: मृत महिलेच्या गर्भाशयातून झाला बाळाचा जन्म; संपूर्ण जग थक्क

uterus transplant UK: विज्ञानाने आजवर अनेक अशक्य गोष्टी शक्य करून दाखवल्या आहेत, मात्र ब्रिटनमध्ये घडलेल्या एका घटनेने संपूर्ण जग थक्क झाले आहे.

पुढारी वृत्तसेवा

Pregnancy

नवी दिल्ली: विज्ञानाने आजवर अनेक अशक्य गोष्टी शक्य करून दाखवल्या आहेत, मात्र ब्रिटनमध्ये घडलेल्या एका घटनेने संपूर्ण जग थक्क झाले आहे. ज्या महिलेला डॉक्टरांनी 'तू कधीच आई होऊ शकणार नाहीस' असे सांगितले होते, आज तिच्या कुशीत एक गोड बाळ खेळत आहे. एका मृत महिलेने दान केलेल्या गर्भाशयामुळे या नव्या आयुष्याला जन्म मिळाला असून, वैद्यकीय क्षेत्रातील हा एक मोठा चमत्कार मानला जात आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

ब्रिटनच्या केंटमध्ये राहणाऱ्या ३० वर्षीय ग्रेस बेल यांच्या आयुष्यात हा आनंदाचा क्षण आला आहे. ग्रेस यांना जन्मतःच 'एमआरकेएच' सिंड्रोम हा दुर्मिळ आजार होता. सोप्या भाषेत सांगायचे तर, ग्रेस यांचे गर्भाशय बाळ जन्माला घालण्यासाठी सक्षम नव्हते. वयाच्या सोळाव्या वर्षी, जेव्हा मुली भविष्याची स्वप्ने पाहतात, तेव्हा ग्रेसला सांगण्यात आले होते की त्या कधीही नैसर्गिकरीत्या आई होऊ शकणार नाहीत.

दोनच पर्याय आणि एक फोन कॉल

आई होण्यासाठी ग्रेस आणि त्यांच्या पतीसमोर दोनच पर्याय होते: सरोगसी किंवा गर्भाशय प्रत्यारोपण. अशातच एक दिवस त्यांना रुग्णालयातून फोन आला की, एका मृत महिलेने दान केलेले गर्भाशय उपलब्ध असून प्रत्यारोपण शक्य आहे.

जून २०२४ मध्ये सलग १० तास अत्यंत गुंतागुंतीची शस्त्रक्रिया करून मृत महिलेचे गर्भाशय ग्रेसच्या शरीरात प्रत्यारोपित करण्यात आले. लंडनच्या 'लिस्टर फर्टिलिटी क्लिनिक'मध्ये आयव्हीएफ (IVF) तंत्रज्ञानाद्वारे त्यांनी गर्भधारणा केली. ख्रिसमसच्या काही दिवस आधी ग्रेस यांनी सात पाऊंड वजनाच्या सुदृढ बाळाला जन्म दिला, ज्याचे नाव त्यांनी 'ह्युगो' ठेवले आहे.

हजारो महिलांसाठी आशेचा किरण

ज्या महिलांना जन्मतः गर्भाशय नाही किंवा काही कारणांमुळे शस्त्रक्रिया करून गर्भाशय काढून टाकावे लागले आहे, अशा महिलांसाठी ही घटना म्हणजे आशेचा किरण आहे. 'ह्युगो'चा जन्म ही केवळ एका कुटुंबाची आनंदाची बातमी नाही, तर जगभरातील त्या हजारो महिलांसाठी आशेचा नवा प्रकाश आहे ज्या गर्भाशयाच्या समस्यांमुळे मातृत्वाच्या सुखापासून वंचित होत्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT