राष्ट्रवादीचे विलिनीकरण लांबणीवर पडले असल्याची माहिती समोर आली आहे. सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांनी 10 ते 15 आमदारांना बोलावून समजूत काढली आहे. सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांनी आमचे कौटुंबिक देखील काही मतभेद असल्याचं सांगत थोडं समजून घेण्याचं आमदारांना भावनिक आवाहन केल्याचं समजते. राष्ट्रवादीतील विलिनीकरणाला चार ते पाच ज्येष्ठ नेत्यांचा विरोध असल्याचं समजतंय. सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, धनंजय मुंडे हे विलिनीकरणाच्या विरोधात असल्याची माहिती आहे. शरद पवारांसोबत जाणाऱ्या इच्छुक आमदारांना सुनील तटकरे यांनी झापल्याचेही समजतंय.