Prasad Vedpathak pudhari
व्हिडिओ गॅलरी

Prasad Vedpathak: जैन धर्मगुरूंसाठी सोसायटीत पांढरी पट्टी... इन्फ्लुएन्सर प्रसाद वेदपाठक यांनी नेमकं काय खटकलं?

Anirudha Sankpal

Prasad Vedpathak white line controversy: मुंबईतील विद्याविहार येथील 'कैलास अवेन्यू' सोसायटीमध्ये सोसायटीच्या परवानगीशिवाय जैन धर्मगुरूंसाठी ऑईल पेंटने मारण्यात आलेल्या पांढऱ्या पट्टीवर मोठा आक्षेप घेण्यात आला आहे. सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर प्रसाद वेदपाठक यांनी या प्रकरणी तीव्र नाराजी व्यक्त करत, इतर रहिवाशांची किंवा लँडलॉर्ड म्हणून त्यांची कोणतीही पूर्वसंमती घेतली नसल्याचा आरोप केला आहे. वेदपाठक यांच्या मते, सोसायटी कमिटीमधील काही जैन सदस्यांनी एकतर्फी निर्णय घेऊन ही परमनंट पांढरी पट्टी मारली आहे, जी सामायिक जागेचा (Common Space) गैरवापर करणारी आहे. त्यांनी यामागील लॉजिकवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत म्हटले की, जर आज अशी पांढरी पट्टी मारली, तर उद्या कोणीही इतर रंगांच्या पट्ट्या मारेल; धार्मिक मान्यता पाळायच्या असल्यास साधुसंतांना खांद्यावर घेऊन घरी न्यावे, पण असे प्रकार करू नयेत. या प्रकारामुळे मानसिक मनस्ताप झाला असून, सर्व रहिवाशांची माफी मागावी आणि ही पांढरी पट्टी तातडीने काढावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT