Pudhari News Dhurla Debate Show
मुंबई : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवरून सुरू असलेला घोळ अजून संपताना दिसत नाही. सार्वत्रिक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या निर्णयाविरुद्ध कोर्टात दाखल झालेल्या याचिकांच्या पार्श्वभूमीवर 24 नगरपरिषद आणि नगरपंचायतींमधील निवडणूक पुढे ढकलण्यात आली होती. त्यासाठी आता 20 डिसेंबर रोजी मतदान होणार असून 21 डिसेंबर मतमोजणी होणार आहे. दुसरीकडे 2 डिसेंबररोजी राज्यातील 246 नगर परिषदा आणि 42 नगर पंचायतींसाठी मतदान पार पडले. मतमोजणी 3 डिसेंबर रोजी होणार होती. मात्र, मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या आदेशामुळे ही मतमोजणी 21 डिसेंबर रोजी होणार आहे. यामुळे निवडणूक आयोगावर सध्या टीकेची झोड उठली आहे. मुख्यमंत्र्यांपासून विरोधी पक्षापर्यंत सर्वच नेते निवडणूक आयोगावर नाराज आहेत.
या पार्श्वभूमीवर सोमवारी पुढारी न्यूजवरील धुरळा या चर्चासत्रात सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी, भाजपाचे सहमुख्य प्रवक्ते अजित चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या प्रवक्त्या सक्षणा सलगर हे सहभागी झाले होते. चर्चासत्रात अजित चव्हाण आणि विश्वंभर चौधरी यांच्यात खडाजंगी झाल्याचं पहायला मिळाले.