Chandrahar Patil Podcast
मुंबई : डबल महाराष्ट्र केसरी पै. चंद्रहार पाटील आता राजकारणात सक्रीय आहेत. पश्चिम महाराष्ट्रात बैलगाडा शर्यतीला नव्या उंचीवर नेणाऱ्या चंद्रहार पाटील यांचा प्रवास उलगडलाय पुढारी न्यूज पॉडकास्टमध्ये.
चंद्रहार पाटील मोठमोठ्या बैलगाडी शर्यती आयोजित करून स्टंट करतात का?
नाही. हा गैरसमज आहे. आम्ही मोठमोठ्या स्पर्धा घेत असल्याने शेतकऱ्यांमध्ये तब्बल 100 कोटी रुपयांची उलाढाल झाली आहे. शेतकरी लोकांना खरी परिस्थिती माहितीये. मी शेतकऱ्याचाच मुलगा आहे. बैलाच्या खरेदीविक्रीच्या व्यवहारात किंमती वाढल्यात. एका बैलाची किंमत 50 लाखांच्या वर पोहोचली. पशूवैद्यकीय दवाखाने, पशूखाद्य विक्रेत्यांचा व्यवसाय जोमात सुरूये.
बैलगाडा शर्यतीत देण्यात येणाऱ्या बक्षीसांची रक्कम कुठून येते?
शेतकऱ्यांना जिथे फायदा होणार असेल तिथे माझ्याकडे आणि माझ्या पक्षाकडे पैसे आहेत. तिन्ही पक्षांच्या मदतीने या स्पर्धा होतायत. यापूर्वीच्या स्पर्धा माझ्या मित्रपरिवाराच्या सहकार्याने झाल्या. त्यांना शब्द टाकला तो पूर्ण होतो.
चंद्रहार पाटील यांचा व्यवसाय काय?
माझा पोल्ट्री, शेती, जमीन आणि पोकलेन, जेसीबी या मशिनरीच्या व्यवसायात मी सक्रीय आहे. आमचा मूळ व्यवसाय शेती आहे. माझे वडील शेतकरी आहेत.
बैलगाडा शर्यत सुरू झाली नसती तर शर्यतीवरील बंदी झाली नसती तर 10- 15 वर्षांनी पुढच्या पिढीला गाय- बैल चित्रात दाखवावं लागलं असतं. शर्यतीमुळे गोवंश संवर्धनाला चालना देता येईल, असा दावाही पाटील यांनी केला. चंद्रहार पाटील यांची संपूर्ण मुलाखत पुढारी न्यूजच्या युट्यूब चॅनलवर पाहता येईल.