Ajit Pawar plane crash case file photo
व्हिडिओ गॅलरी

Ajit Pawar plane crash: पायलटच्या चुकीमुळे अजित पवारांच्या विमानाचा अपघात; कंपनीचे मालक व्ही. के. सिंग यांचा CID कडे जबाब

अजित पवारांच्या विमान अपघाता संदर्भात एक महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे. व्हीएसआर कंपनीचे मालक व्ही के सिंग यांची तीन दिवस सीआरडीने चौकशी केली.

पुढारी वृत्तसेवा

Ajit Pawar plane crash:

पुणे: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघात संदर्भात एक महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या सीआयडीने 'व्हीएसआर' विमान कंपनीचे मालक व्ही. के. सिंग यांची सलग तीन दिवस सखोल चौकशी केली. या चौकशीदरम्यान, सिंग यांनी आपला जबाब नोंदवताना, या संपूर्ण अपघाताला पायलट सुमित कपूर याचीच चूक होती, असे म्हटले आहे.

सिंग यांची चौकशी करण्यासाठी सीआयडीने कमालीची गोपनीयता पाळली होती. चौकशीच्या पहिल्या दिवशी माध्यम प्रतिनिधींनी सीआयडी कार्यालयाबाहेर मोठी गर्दी केली होती. सिंग यांची प्रतिक्रिया घेण्यासाठी पत्रकारांची चढाओढ सुरू होती. ही गर्दी लक्षात घेता, सीआयडीने पुढचे दोन दिवस अत्यंत गुप्तता पाळून आपली कारवाई पूर्ण केली. व्ही. के. सिंग यांच्या जबाबानंतर सीआयडी आता व्ही. के. सिंग यांचा मुलगा रोहित सिंग याचीही चौकशी करणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT