कॅटरिना आणि विकी कौशल 
Latest

Vicky Kaushal Birthday : विक्कीला कॅटरिनाकडून रोमॅंटिक अंदाजात शुभेच्छा (video)

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन : बॉलिवूड अभिनेचा विक्की कौशलने आपला ३४ व्या वाढदिवस न्यूयॉर्कमध्ये धुमधडाक्यात साजरा केला. दोघाच्या लग्नानंतरचा विक्कीचा पहिला वाढदिवस ( vicky kaushal birthday ) असल्याने कॅटरिनाकडून खास गिफ्ट मिळाले आहे. या जंगी सेलेब्रेशनचा एक व्हिडिओ आणि फोटो सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

अभिनेता विक्की कौशल आणि अभिनेत्री कॅटरिना कैफने गेल्या डिसेबर महिन्यात २०२१ रोजी लग्नबंधनात अडकले. यानंतर सुट्ट्यांचा आनंद घेताना दोघेजण दिसले. याच दरम्यान काल (१६ रोजी) विक्कीचा ३४ व्या वाढदिवस ( vicky kaushal birthday ) न्युयॉर्कमध्ये साजरा करण्यात आला. हा वाढदिवस खास बनवण्यासाठी कॅटरिनाने सोशल मीडियावर एक फोटो शेअर करून पतीला हटके शुभेच्छा दिल्या आहेत. हा वाढदिवस नुकताच न्यूयॉर्कमध्ये दोघांच्या काही निवडक मित्र-मैत्रीणीसोबत पार पडला.

या फोटोच्या कॅप्शनमध्ये कॅटरिनाने 'न्यूयॉर्क वाला वाढदिवस ?, My ❤️Simply put…YOU MAKE EVERYTHING BETTER ?'. असे म्हटले आहे. तर या फोटोला रिप्लाय देताना विक्कीने 'शादीवाला बर्थडे!!! ❤️❤️❤️'. असे म्हटले आहे. याचा व्हिडिओ विरल भयानी इंन्स्टाग्रामवर व्हायरल झाला आहे. कॅटने शेअर केलेल्या एका फोटोत ती विक्कीकडे प्रेमाने पाहताना दिसतेय. तर दुसऱ्या फोटोत विक्की कॅटला किस करताना दिसत आहे. यावरून दोघेजण सध्या रोमॅंटिक मूडमध्ये असल्याचे दिसतात.

या व्हिडिओत विकी भला मोठा केक कापताना दिसतोय तर कॅटरिना त्याच्या बाजूला असून आनंदीत दिसत आहे. याशिवाय शेअर झालेल्या काही फोटोत कॅट आणि विकीसोबत मित्र-मैत्रिणीसोबत मोजमस्ती करताना दिसल्या. हे फोटो सोशल मीडियावर शेअर होताच चाहत्यांसह बॉलिवूड स्टार्संनी भरभरून कॉमेन्टस केल्या आहेत.

यात विक्कीचा धाकटा भाऊ सनी कौशलने 'हॅपी बर्थडे माय डिअर.' आणि बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राने 'Happiest birthday @vickykaushal09 ❤️?.' असे लिहिले आहे. तर नेही धुपियाने चार हार्ट ईमोजी शेअर केले आहेत. काही युजर्सनी विक्कीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत हार्ट आणि फायरचे ईमोजी शेअर केले आहेत. कॅटरिना आणि विक्कीने गेल्या वर्षी ९ डिसेंबर २०२१ रोजी राजस्थानच्या सिक्स सेन्सेस फोर्टमध्ये लग्नगाठ बांधली. दोघेजण नेहमी सोशल मीडियावर सक्रिय असतात.

कॅटरिनाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास ती लवकरच सलमान खानसोबत 'टायगर ३' या चित्रपटात दिसणार आहे. याशिवाय ती सिद्धांत चतुर्वेदी आणि ईशान खट्टरसोबत 'फोन भूत' मध्ये दिसणार आहे. विक्कीबद्दल बोलायचे झाल्यास तर तो बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खानसोबत आगामी चित्रपट 'प्रॉडक्शन नंबर 25' ची शूटिंग करत आहे. याशिवाय विक्की लवकरच 'गोविंदा नाम मेरा', 'द ग्रेट इंडियन फॅमिली' आणि दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांच्या आगामी 'अनटाइटल्ड' चित्रपटात दिसणार आहे.

हेही वाचलंत का? 

(vidro: viralbhayani instagram वरून साभार)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT