पराष्‍ट्रपती (Vice President) आणि राज्‍यसभेचे सभापती जगदीप धनखड. (संग्रहित छायाचित्र ) 
Latest

मी पीडित, मला सतत अपमानाला सामोरे जावे लागते : उपराष्ट्रपतींचा विरोधकांवर निशाणा

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : मी पीडित आहे! सर्व अपमान सहन करून त्याचा सामना कसा करायचा आणि भारत मातेची सेवा कशी करायची हे माहीत असलेली पीडित आहे, अशा शब्‍दांमध्‍ये उपराष्‍ट्रपती (Vice President) आणि राज्‍यसभेचे सभापती जगदीप धनखड (Jagdeep Dhankhar) यांची विरोधी पक्षांवर निशाणा साधला. भारतीय सांख्यिकी सेवेच्या प्रक्षिणार्थी उमेदवारांना संबोधित करताना ते बोलत होते. (Mimicry Row)

टीकेला सामोरे जाण्‍यासाठी सज्‍ज राहा

संसदेच्‍या हिवाळी अधिवेशन काळात तृणमूल काँग्रेसच्‍या खासदारांनी त्‍यांची नक्‍कल केली होती. यावर बोलताना धनखड म्‍हणाले की, मी एक पीडित आहे. मला सतत अपमानाला सामोरे जावे लागते. सर्व अपमान सहन करून त्याचा सामना कसा करायचा आणि भारत मातेची सेवा कशी करायची हे माहीत असलेली पीडित आहे, असे सांगत त्‍यांनी भावी
अधिकार्‍यांना टीकेला सामोरे जाण्‍यासाठी सज्‍ज राहा, असा सल्‍ला दिला.

मी सत्याच्या मार्गावर आहे

मी घटनात्मक पदावर कार्यरत आहे. राज्यसभेचा अध्यक्ष आणि उपराष्ट्रपती आहे. तरीही लोक मला सोडत नाहीत; पण यामुळे मी माझी मानसिकता बदलली पाहिजे का? ते मला माझ्या मार्गावरून वळवू शकेल का? तर याचे उत्तर नाही असे आहे. मी सत्याच्या मार्गावर आहे आणि आपल्याला नेहमी पुढे जात राहायचे आहे, असेही धनखड यांनी नमूद केले.,

Mimicry Row : खा. कल्याण बॅनर्जींनी उडवली होती उपराष्ट्रपतींची खिल्ली

नुकतेच संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान विरोधी पक्षाच्या खासदारांनी संसदेच्या सुरक्षेच्या मुद्द्यावरून सभागृहात गदारोळ केला होता. यावरुन विरोधी पक्षाच्या खासदारांना संसदेच्या दोन्ही सभागृहातून निलंबित करण्यात आले. याविरोधात संसद भवन संकुलात विरोधकांनी निदर्शने केली. या निषेधादरम्यान टीएमसी खासदार कल्याण बॅनर्जी यांनी उपाध्यक्ष जगदीप धनखर यांची खिल्ली उडवली आणि त्यांची नक्कल केली होती. तर काँग्रेस खासदार राहुल गांधी कल्याण बॅनर्जी करत असलेल्‍या मिमिक्रीचे चित्रकरण करत असताना दिसले. या प्रकारावरजगदीप धनखड यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत हा आपल्यावरील वैयक्तिक हल्ला असल्याचे म्हटले होते.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT