सिटाडेल: हनी-बनी 
Latest

Citadel : Honey Bunny – वरुण-सामंथाचा स्पाय थ्रिलर सीरीज फर्स्ट लूक आऊट

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : वरुण धवन आणि दाक्षिणात्य अभिनेत्री सामंथा रुथ प्रभू यांची पहिली सीरीज 'सिटाडेल'ला नाव देण्यात आले आहे. 'सिटाडेल: हनी-बनी' (Citadel: Honey Bunny) असे या सीरीजचे नाव असून, त्याची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. (Citadel: Honey Bunny ) ही मालिका प्राईम व्हिडिओवर प्रसारित होणार आहे. ही सीरीज राज आणि डीके यांनी तयार केली आहे. कलाकारांमध्ये केके मेनन, सिमरन, सोहम मजुमदार, शिवंकित परिहार, काशवी मजुमदार, साकिब सलीम आणि सिकंदर खेर सहाय्यक भूमिकेत आहेत.

प्राईम व्हिडिओने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर वरुण आणि सामंथाच्या चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. प्राईम व्हिडिओने आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, 'प्राईम व्हिडिओ सिटाडेल युनिव्हर्ससह, प्राईम व्हिडिओने त्याचे इंडियन व्हर्जन कन्फर्म केले आहे, जे सिटाडेल: हनी-बनी' म्हणून ओळखले जाईल.

सिटाडेल: हनी बनी ही एक स्पाय ॲक्शन थ्रिलर मालिका आहे, जी प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करणार आहे, त्यासोबतच यात प्रेमकथा देखील आहे.

निर्मात्यांनी अद्याप सीरीजची रिलीज डेट जाहीर केलेली नाही. D2R फिल्म्स प्रोडक्शन कंपनीने त्याची निर्मिती केली आहे. हे राज आणि डीके आणि सीता मेनन यांनी कथा लिहिली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT