पुढारी ऑनलाईन डेस्क
शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांना कोरोनाची लागण झाली आहे. विशेष म्हणजे, साेमवारी शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड विधानसभेत उपस्थित होत्या.
वर्षा गायकवाड यांनी कोरोना चाचणी सोमवारी केली होती. त्याला अहवाल मंगळवारी प्राप्त झाला. त्याला अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. याची माहिती त्यांनी स्वत: ट्विटरच्या माध्यमातून दिली.
त्यांनी ट्विट मध्ये म्हटलं आहे की, सोमवारी सायंकाळी मला लक्षणं जावली. मी कोरोना चाचणी केली. माझी चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मी ठीक आहे. मी विलगीकरणात राहणार आहे. मागील काही दिवस मला भेटलेल्यांनी चाचणी करुन घ्यावी तसेच काळजी घ्यावी, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.