vanita kharat-sumit londhe  
Latest

Vanita Kharat Wedding Pics: साथिया म्हणत वनिता खरातचे ‘शुभमंगल सावधान’

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : अभिनेत्री वनिता खरात तिचा बॉयफ्रेंड सुमित लोंढेशी विवाहबंधनात अडकली. तिच्या लग्नाला महाराष्ट्राची (Vanita Kharat Wedding Pics) हास्यजत्राची संपूर्ण टीम तिच्या लग्नाला उपस्थित होती. यावेळी नातेवाईक व मित्रपरिवाराच्या उपस्थितीत वनिताने सुमित लोंढेशी लग्नगाठ बांधली. यावेळी सुमित-वनिता दोघेही खूप सुंदर दिसत होते. दोघांचे लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. (Vanita Kharat Wedding Pics)

वनिताने लग्नासाठी पांढऱ्या रंगाची नऊवारी साडी नेसली होती. त्यावर जरी वर्क असलेले गुलाबी रंगाचे ब्लाऊज घातले होते. शिवाय गुलाबी रंगाचा पैठणी शेला तिने घेतला होता. सुंदर मेकअप , मोजके दागिने, केसांचा अंबाडा आणि त्यामध्ये फुले, असा साजशृंगार करत वनिता नटली होती. तर सुमितने पांढऱ्या रंगाची शेरवानी, त्यावर गुलाबी रंगाचा फेटा असा लूक केला होता. दोघेही इतक्या सुंदर लूकमध्ये दिसले.

या दोघांच लग्नातील फोटो diaries of ananda या नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्य़ात आले आहेत. याआदी सुमित-वणीचे मेहंदी आणि हळदीचे फोटो व्हायरल झाले होते. तुम्ही हे फोटो येथे पाहू शकता.

(photos, video- diaries of ananda insta वरून साभार)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT