Vamika Kohli-Virat Kohli  
Latest

Vamika : Virat Kohli चा वामिकासोबत ‘तो’ फोटो व्हायरल, फॅन्स म्हणाले-‘ज्युनियर अनुष्काच ओ..’

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : दुसऱ्या मुलाच्या जन्मानंतर विराट आणि अनुष्का लंडनमध्येच राहिले आहेत. दरम्यान, सोशल मीडियावर वामिकाचे काही फोटो व्हायरल झाले आहेत. (Vamika ) विराट वा अनुष्काने कधी ऑफिशियली पोस्ट केलं नाही. आता लंडनमधून वामिकाचा विराटसोबत फोटो व्हायरल झाला आहे. (Vamika)

विराट – अनुष्काच्या घरी मुलगा 'अकाय'ने जन्म घेतला. बाळाची झलक पाहण्यासाठी फॅन्स खूप उत्सुक आहेत. दरम्यान, लंडनमधून विराटचा एक फोटो चर्चेत आला आहे. लंडनमधील एका रेस्टॉरेंटमधून विराट आणि वामिकाचा फोटो समोर आला आहे.

रेस्टॉरंटमध्ये विराट कोहली स्पॉट

विराट नेहमी मुलगी वामिकाची काळजी घेताना दिसतो. अनेकदा सोशल मीडिया युजर्सनी त्याचे कौतुक देखील केले आहे. आता लंडनमधून व्हायरल झालेल्या फोटोमध्ये विराट-वामिका काहीतरी खाताना दिसत आहेत. हा फोटो मागून क्लिक करण्यात आल्यामुळे दोघांचाही चेहरा दिसत नाही. पण, हे स्पष्ट आहे की, ते दोघे विराट-वामिकाच आहेत.

फॅन्स म्हणाले…

एका युजरने कॉमेंटमध्ये म्हटले आहे, 'पप्पांसोबत थोडे टाईम घालवताना, जेव्हा आई आणि भाऊ एकत्र सोबत असतील. परंतु, ज्याने कुणी हा फोटो घेतला, त्याला याप्रकारे दखल नाही द्यायला हवं होतं.' एकाने लिहिलं, 'ही क्यूट आहे, परंतु, त्यांच्या परवानगी विना फोटो घेणं खूप रूड बिहेवियर आहे.' आणखी एकाने कॉमेंट केलं, 'ही किती क्यूट आहे. मी ज्युनियर अनुष्काचा विचार करत आहे.'

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT