नवी दिल्ली; वृत्तसंस्था : Uttarakhand Heavy Rainfall : उत्तराखंडमध्ये गेल्या चोवीस तासांत मुसळधार पावसामुळे 9 जणांचा मृत्यू झाला, तर 12 जखमी झाले आहेत. ऋषीकेशच्या धलवाला आणि खारा परिसराला पावसाने चांगलेच झोडपले आहे. बुधवारी रात्री उशिरा 'एसडीआरफ'च्या पथकाने 50 लोकांना वाचवले असून, त्यांना सुरक्षित स्थळी हालवण्यात आले आहे.
हल्दानीमध्ये महापुरात अडकलेल्या 150 जणांना वाचविण्यात आले आहे. राज्यातील नैनीताल, चंपावत, उधम सिंहनगर आणि पौडी जिल्ह्यात पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. दुसरीकडे हिमाचल प्रदेशात 24 जूनपासून आतापर्यंत मुसळधार पावसाने 223 जणांचा बळी घेतला आहे, तर 295 लोक जखमी झाले आहेत. सुमारे 800 घरे पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत आणि 7 हजार 500 घरांचे मोठे नुकसान झाले आहे. जम्मू-काश्मीर, पंजाब, हिमाचल प्रदेश, दिल्ली, हरियाणा, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, बिहार, सिक्किम, पश्चिम बंगाल, आसाम, मेघालय, अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर, मिझोरम, त्रिपुरा आणि तामिळनाडूमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
बिहारमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे राज्यातील नद्यांची पाणी पातळी वाढली आहे. बागमती, कमला आणि भूतही नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. गंगा आणि गंडक नद्या धोक्याच्या पातळीवर पोहोचल्या आहेत. पाटणामध्ये महापुराचे संकट वाढत असून, गंगा नदीचे पाणी खाली भागात घुसले आहे.
हे ही वाचा :