file photo  
Latest

कोयना धरणात उपयुक्त पाणीसाठा केवळ 6 टीएमसी

Arun Patil

पाटण, पुढारी वृत्तसेवा : कोयना धरणांतर्गत विभागात अद्यापही पाऊस पडत नसल्याने धरणातील पाणीसाठा अधिकाधिक खालावत चालला आहे. कोयना चौथ्या टप्प्यातील वीजनिर्मिती बंद ठेवली असून पूर्वेकडे सिंचनासाठी व पोफळी, अलोरे जलविद्युत प्रकल्पांसाठी अत्यल्प पाणी सोडण्यात येत आहे. धरणात सध्या उपयुक्त केवळ 6.03 टीएमसी इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे.

105.25 टीएमसी पाणी साठवण क्षमता असलेल्या कोयना धरणात सध्या 11.03 टीएमसी म्हणजेच एकूण क्षमतेच्या 10.03 टक्के इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. त्यापैकी उपयुक्त साठा अवघा 6.03 टीएमसी आहे.

धरणातील पाण्यावर पश्चिमेकडे पोफळी, अलोरे व कोयना चौथा टप्पा या तीन टप्प्यातून 1920 मेगॅवॅट वीजनिर्मिती केली जाते. पाण्याअभावी तसेच राज्यातील अन्य प्रकल्पातून उपलब्ध होत असलेल्या वीजेमुळे कोयनेतून अपेक्षित मागणी नसल्याने चौथ्या टप्प्यातील वीजनिर्मिती बंद ठेवली आहे. सध्याची जलपातळी 618.696 मीटर इतकी आहे. धरणात अपेक्षित पाऊस व पाणीसाठा झाल्यानंतरच चौथ्या टप्प्यातून वीजनिर्मिती पुन्हा सुरू करण्यात येईल. अद्यापही कोयना जलविद्युत प्रकल्पाच्या पोफळी व अलोरे जलविद्युत प्रकल्पातून अपेक्षित व मागणीनुसार टप्प्याटप्प्याने वीजनिर्मिती सुरू आहे. धरणाची एकूणच पाणी साठवण क्षमता खालावत असल्याने चिंता वाढली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT