पुढारी ऑनलाईन : अमेरिकेच्या मध्यावती निवडणुकीत (US Mid-Term Polls) भारतीय अमेरिकन वंशाच्या पाच व्यक्ती यूएस हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हमध्ये निवडून गेल्या आहेत. यामध्ये राजा कृष्णमृती, रो खन्ना, प्रमिला जयपाल, अमी बेरा, श्री ठाणेदार आणि अरुणा मिलर या व्यक्तींचा समावेश आहे. वॉशिंग्टन पोस्ट न्यूजपेपर्सने दिलेल्या वृत्तानुसार, अमेरिकेच्या अटीतटीच्या मध्यावधी निवडणुकीत मूळ भारतीय वंशाच्या अमेरिकेन व्यक्तींची महत्त्वाची भूमिका पाहायला मिळाली आहे.
अमेरिकेच्या मध्यावती निवडणुकीत (US Mid-Term Polls) निवडून आलेल्या व्यक्ती या अमेरिकेतील सत्ताधारी डेमोक्रेट पार्टीच्या सदस्य आहेत. या सर्व भारतीय वंशाच्या नेत्यांच्या विजयाने भारतीय वंशाच्या अमेरिकन नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. या निवडणूकीत रो खन्ना, कृष्णमूर्ती आणि जयपाल या उमेदवारांनी सलग चौथ्यांदा या निवडणुकीत विजय मिळवत, अमेरिकन राजकारणातील आपले स्थान अधिक भक्कम केले आहे.