Latest

US : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षपदाचे उमेदवार भारतीय वंशाचे रामास्वामी यांना जिवे मारण्याची धमकी

मोहन कारंडे

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय वंशाचे अमेरिकन राष्ट्रपती पदाचे उमेदवार विवेक रामास्वामी यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. ३० वर्षीय टायलर अँडरसन असे संशयिताचे नाव आहे.

यूएस डिपार्टमेंट ऑफ जस्टिसनुसार, अँडरसनने दोन संदेश जारी केले होते. त्याच्या पहिल्या संदेशात म्हटले होते की, 'छान, माझ्यासाठी उमेदवाराचे डोके उडवण्याची चांगली संधी आहे.' तर त्याच्या दुसऱ्या मेसेजमध्ये तो म्हणाला, 'मी या कार्यक्रमांना सहभागी होणाऱ्या सर्वांना ठार करणार.' रामास्वामी यांनी या धमकीची पोलिसांना माहिती दिली. या प्रकरणी अँडरसन याला पाच वर्षांचा तुरुंगवास, तीन वर्षांची पर्यवेक्षी सुटका आणि २५०,००० डॉलर दंड ठोठावण्यात आला आहे. अँडरसनच्या अटकेनंतर रामास्वामी यांनी कायदा अंमलबजावणी यंत्रणांचे आभार व्यक्त केले.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT