US Ambassador Eric Garcetti - Shah Rukh  
Latest

अमेरिकेचे भारतातील राजदूत एरिक गार्सेटी यांचा बॉलिवूड डेब्यू? शाहरुखसोबत फोटो व्हायरल

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : अमेरिकेचे भारतातील राजदूत एरिक गार्सेटी यांनी अहमदाबादमधील साबरमती आश्रमाला भेट दिली. येथे त्यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी त्यांनी आश्रममध्ये 'चरखा' देखील चालवला. एरिक गार्सेटी यांनी शाहरुख खानची मन्नत निवासस्थानी भेट घेतली. यावेळी दोघांमध्ये भारतीय चित्रपट इंडस्ट्रीशिवाय जगभरात पडलेल्या बॉलीवूडच्या प्रभावावर चर्चा केली.

सोशल मीडियावर दिली माहिती

या गोष्टीची माहिती स्वत: गार्सेटी यांनी स्वत: सोशल मीडियावर दिली. त्यांनी ट्विट केलं की, "काय ही माझी बॉलीवूड डेब्यूची वेळ आहे? सुपरस्टार शाहरुख खानसोबत त्यांचा एक फोटोदेखील व्हायरल झाला आहे.

या चित्रपटात दिसणार शाहरुख

पठाननंतर शाहरुख लवकरच जवानमध्ये दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रसिद्ध तमिळ दिग्दर्शक एटली करत आहेत. फॅन्सना या चित्रपटाची मोठी प्रतीक्षा लागून राहिली आहे. किंग खानने या चित्रपटाची छोटीशी झलक सोशल मीडियावर शेअर करत माहिती दिली होती. जवान ७ सप्टेंबर रोजी चित्रपटगृहात रिलीज होईल. याशिवाय तो राजकुमार हिरानीचा चित्रपट डंकीमध्येही दिसणार आहे. हा चित्रपट ख्रिसमसला रिलीज होणार आहे, असे म्हटले जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT