पुणे : पुढारी वृत्तसेवा : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचा नुकताच पुण्यासह बारामतीचा दौरा पार पडला. त्यानंतर आता पुढच्याच महिन्यात म्हणजेच डिसेंबरमध्ये त्या पुन्हा बारामती दौर्यासाठी येणार आहेत. तत्पुर्वी त्यांच्या या दौर्याच्या तयारीसाठी केंद्रीय राज्यमंत्री प्रल्हादसिंग पटेल बारामती लोकसभा मतदार संघाच्या दोन दिवसीय दौर्यावर येणार आहे. गुरूवार दिनांक 11 नोव्हेंबर 2022 रोजी ते खडकवासला मतदार संघात असतील.
त्यानंतर त्यांचा पहिल्या दिवशी भोर विधानसभा मतदार संघ, पुरंदर विधानसभा मतदार संघ आणि शेवटी बारामती मतदार संघ असा प्रवास असेल. दुसर्या दिवशी इंदापूर, दौंड विधानसभा मतदार संघात दौरा करतील. त्यानंतर ते पुण्यात कौंन्सिल हॉल येथे पत्रकारांशी संवाद साधणार आहेत. अशी माहिती भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष राहूल शेवाळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.