Uncategorized

सोलापूर : हातभट्टीसह फू्रट बिअरवर सीमा शुल्कची कारवाई

backup backup

सोलापूर ः पुढारी वृत्तसेवा हातभट्टी दारूनिर्मिती व फ्रूट बिअर वाहतुकीवर कारवाई करून राज्य उत्पादन शुल्क विभागाने 5 लाख 56 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई बक्षीहिप्परगा सेवातांडा व विनायकनगरजवळ करण्यात आली. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने दक्षिण सोलापूर तालुक्यातील बक्षीहिप्परगा सेवातांडा येथील हातभट्टी दारूनिर्मिती केंद्रावर पहाटेच्या सुमारास छापा टाकून हातभट्टी तयार करण्याचे 5 अड्डे उद्ध्वस्त केले. या कारवाईत 3 लाख 45 हजार 900 किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. यातील फरार आरोपींविरुध्द गुन्हे दाखल झाले आहेत.

शहरातील विनायकनगर परिसरात अवैध फ्रूट बिअरची वाहतूक करून त्यातील 234 लिटर फ्रूट बिअर जप्त करण्यात आली. या कारवाईदरम्यान तरबेज अब्दुल रहीम सगरी व मोहसीन सादिक सगरी (दोघे रा. सरवदेनगर, मुळेगाव रोड) या दोघांना अटक करण्यात आली आहे. या कारवाईत 2 लाख 10 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक एस.एम. फडतरे, मानके, कदम, दुय्यम निरीक्षक मिसाळ, झगडे, पाटील, देशमुख, होळकर यांनी पार पाडली.

SCROLL FOR NEXT