Uncategorized

‘हर घर तिरंगा’बाबत बचत गटांना मार्गदर्शन

backup backup

अक्कलकोट : पुढारी वृत्तसेवा 'स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव' अंतर्गत 'हर घर तिरंगा' उपक्रमाची अंमलबजावणी करण्यासाठी मैंदर्गी शहरातील बचत गटाच्या महिलांना ही तिरंगा बनविण्याचे काम करावे व त्याचे वितरण नगरपालिकेसह शहरात विकण्यास परवानगी असल्याचे मुख्याधिकारी श्रीकांत लाळगे यांनी सांगितले. मुख्याधिकारी लाळगे बचत गटांच्या बैठकीत बोलत होते. 20 जुलै 2022 रोजी मैंदर्गी नगरपरिषद कार्यालयात दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानांतर्गत जिल्हाधिकार्‍यांनी दिलेल्या सूचनांचे पालन करताना मैंदर्गी शहरातील बचत गटांतील महिलांना 'हर घर तिरंगा' उपक्रमाची लाळगे यांनी माहिती देऊन नगरपरिषद कार्यालयात तिरंगा विकण्यासाठी परवानगी दिली.

शहरातील सर्व शासकीय/निमशासकीय, शाळा, महाविद्यालये व नागरिकांना 'हर घर तिरंगा' अंतर्गत तिरंगा झेंडा लावण्यासंदर्भात मार्गदर्शन केले. तसेच 'स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव' अंतर्गत बचत गटांतील महिला व मुलींना जिल्हा उद्योग केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांना शिवणकाम सुरू करण्यात येणार आहे. शहरातील जास्तीत जास्त महिला व मुलींनी याचा लाभ घ्यावा, असे सांगितले. याप्रसंगी जिल्हा उद्योग केंद्र प्रकल्प अधिकारी राजशेखर शिंदे, सहा. प्रकल्प अधिकारी राजेंद्र गायधनकर आदी उपस्थित होते.

SCROLL FOR NEXT