Uncategorized

‘स्वच्छ शहर, सुंदर शहर’ ही संकल्पना प्रत्यक्षात राबवावी

अमृता चौगुले

सांगोला (साेलापूर ) : पुढारी वृत्तसेवा :  'स्वच्छ शहर सुंदर शहर' संकल्पना राबवताना, सांगोला नगरपालिकेने खडतरे गल्ली हा भाग वगळला आहे का?, असा सवाल नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे. खडतरे गल्ली येथील रस्त्याला लागूनच मोठ्या प्रमाणात कचरा साचला आहे. सध्या या परिसरात दुर्गंधी पसरली आहे. यावर पालिका प्रशासनाकडून वेळोवेळी स्वच्छता मोहीम राबवली जात नसल्याने हा प्रकार सुरू आहे. यावर मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांनी याकडे लक्ष देऊन स्वच्छ शहर सुंदर शहर ही संकल्पना प्रत्यक्षात राबवावी, अशी मागणी खडतरे गल्ली परिसरातील आजी-माजी नगरसेवक व नागरिकांकडून केली जात आहे.

स्वच्छ शहर सुंदर शहर, ही संकल्पना राबवत असताना सांगोलकरांनी या संकल्पनेला भरभरून प्रतिसाद दिला आहे. मात्र नगरपालिका प्रशासनाकडून याकडे गांभीर्य घेतले जात नसल्याने शहराच्या स्वच्छतेवर आणि सुंदरतेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभारले जात आहे. स्वच्छ शहर सुंदर शहर ही संकल्पना कागदावरच राहत आहे. प्रत्यक्षात मात्र शहराच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमधून याबाबत संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. हवामानात होणारा दररोज बदल त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्‍न निर्माण होत आहे. यामध्येच भरीस- भर म्हणून नगरपालिकेकडून वेळोवेळी स्वच्छता केली जात नसल्याने याचा परिणाम नागरिक नागरिकांना सहन करावा लागत आहे.

नगरपालिका प्रशासनाने घोषणा बरोबर त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी देखील करावी अशी मागणी नागरिकांमधून जोर धरत आहे.
खडतरे गल्ली येथील मुख्य रस्त्या वरची ही अवस्था कायमस्वरूपी कचरा अशा प्रकारे रस्त्यावर कचरा ठिकठिकाणी शहरात देखील सर्व भागांमध्ये अशीच परिस्थिती आहे. आरोग्य विभाग याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे का? शहरातील सर्व रस्त्यावर खड्डे पडलेले आहेत.

मुख्याधिकारी यांचे शहरावरील लक्ष कमी झाले आहे का? प्रशासन-प्रशासक असताना अशी अवस्था योग्य नाही. अशा पद्धतीच्या संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करीत पालिकेच्या कामकाजावर नागरिकांमधून तीव्र नाराजीचा सूर आहे. तरी याबाबत मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांनी स्वतः लक्ष घालून शहराच्या स्वच्छतेवर अधिक भर द्यावा. तसेच वेळोवेळी स्वच्छता मोहीम राबवावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT