Uncategorized

सोलापूर : केगाव ते तांदुळवाडी रिंगरुटचे येत्या दोन दिवसांत आदेश

दिनेश चोरगे

सोलापूर , महेश पांढरे :  सुरत-चेन्नई ग्रीन कॉरिडॉर या राष्ट्रीय महामार्गाचा एक भाग असलेल्या हत्तूर ते तांदुळवाडी आणि केगाव ते तादुळवाडी या 90 कि.मी. च्या रस्त्यासाठीचे आदेश येत्या दोन दिवसांत देण्यात येणार आहेत. लवकरच या मार्गावर येणार्‍या शेतजमिनीचे गट क्रमांक जाहीर करण्यात येणार असून त्यानंतर प्रत्यक्षात भूसंपादनाची प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.

सुरत ते चेन्नई हा राष्ट्रीय महामार्ग सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट, बार्शी आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातून जाणार आहे. या प्रकल्पाचाच एक भाग म्हणून सोलापूर शहरात विविध राज्यांतून येणारी वाहतूक शहरात न येता बाह्यमार्गाने जोडण्यासाठीच दक्षिण सोलापूर तालुक्यातील हत्तूर ते तांदुळवाडी आणि केगाव ते तांदुळवाडी असा जवळपास 90 कि.मी.चा रिंगरुट अर्थात बाह्यवळण मार्ग तयार करण्यात येणार आहे. त्यासाठी हत्तूर ते तांदुळवाडी हा महामार्ग दक्षिण सोलापूर तालुक्यातील अनेक गावांतून जाणार आहे. तो जवळपास 28 कि.मी.चा आहे.

केगाव ते तांदुळवाडी हा रिंगरुट उत्तर आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातून जाणार असून तो जवळपास 32 ते 40 कि.मी.चा आहे. त्यासाठीचे राजपत्रक गेल्या दोन महिन्यांपूर्वीच प्रकाशित झाले आहे. प्रत्यक्ष प्रकल्पाचा अहवाल जिल्हा प्रशासनाकडे आलेला नव्हता. त्यामुळे कोणत्या भागातील किती जमीन यासाठी आवश्यक आहे, याची माहिती गोळा करण्याचे काम सुरु होते. आता हत्तूर ते तांदुळवाडी आणि केगाव ते तांदुळवाडी असा जवळपास 90 कि.मी.च्या रिंगरुटचा प्रकल्प अहवाल जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला आहे.

हा महामार्ग उत्तर सोलापूर तालुक्यातील केगाव येथून शिवाजीनगर, बाळे, खेड, गुळवंची, बाणेगाव, मार्डी, होनसळ आणि राळेरासमार्गे दक्षिण सोलापूर तालुक्यात जाणार आहे. त्यासाठीचे मार्किंग उत्तर सोलापूर तालुक्यातील अनेक गावांत झाले आहे. त्यामुळे शेतकर्‍यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

हा मार्ग नेमका कोठून जाणार, किती क्षेत्रातून जाणार, त्याचा फायदा कोणाला होणार तसेच त्याची नुकसान भरपाई कशी मिळणार, असे अनेक प्रश्‍न या निमित्ताने उपस्थित झाले होते. याविषयी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर म्हणाले, या प्रकल्पाचा अहवाल जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला आहे. त्यासाठी लागणार्‍या जमिनीचे भूसंपादन करण्यासाठीचे आदेश येत्या दोन दिवसांत देण्यात येणार आहेत. त्यानंतर या मार्गावर येणारे शेतीचे गट प्रसिध्द करण्यात येणार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT