Uncategorized

सोलापूर : सिध्देश्‍वरांच्या महाआरतीने शिवसेना वर्धापन दिन

backup backup

सोलापूर : पुढारी वृत्तसेवा शिवसेनेच्या स्थापना दिवसाला 56 वर्षे पूर्ण झाली त्यानिमित्त शिवसेनेच्या वतीने सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिध्देश्‍वर महाराज यांची महाआरती करण्यात आली.तसेच येत्या महापालिका निवडणूकीत महापालिकेची सत्ता येण्यासाठीचे साकडे पदाधिकार्‍यांनी घातले श्री शिवयोगी सिद्धरामेश्‍वर मंदिर येथे जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे शहरप्रमुख गुरुशांत धुत्तरगावकर, उपजिल्हाप्रमुख दत्ता वानकर, प्रताप चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली शिवयोगी सिद्धरामेश्‍वर देवस्थानी महाआरती व प्रार्थना करण्यात आली.

गेल्या 56 वर्षार्ंत शिवसेनेेने अनेक समाजोपयोगी कामे केली आहेत. तसेच सामाजिक आणि राजकीय घडणघडणीत शिवसेना पदाधिकार्‍यांचे मोलाचे योगदान आहे. येणार्‍या काळातही शिवसेना 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण करण्यावरच ठाम राहील, असा विश्‍वासही यावेळी व्यक्त करण्यात आला.

यावेळी भीमाशंकर म्हेत्रे, अमर पाटील, उपशहरप्रमुख रेवण पुराणिक, पुकाळे, बाळासाहेब गायकवाड, संजय गवळी, अमित भोसले, गुरुनाथ शिंदे, माऊली आवताडे, विष्णू जगताप , निरंजन बोधूल व इतर सर्व शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT