Uncategorized

सातारा-फलटण येथील अल्पवयीन युवती वेंगुर्ले पोलिसांच्या ताब्यात

मोहन कारंडे

वेंगुर्ले : पुढारी वृत्तसेवा
सातारा जिल्ह्यातील फलटण येथील एका प्रेमीयुगुलास वेंगुर्ले पोलिस व जिल्हा वाहतूक शाखा पोलिसांच्या पेट्रोलिंग पथकाने असताना मंगळवारी सकाळी 10.30 वा. वेंगुर्ले-निमुसगा येथे पकडले. मात्र, पोलिस चौकशी करत असल्याची संधी साधून संबंधित युवक जंगलात पळून गेला. तर त्याच्यासोबत असलेली युवती अल्पवयीन असल्याचे तसेच तिला संबंधित तरुणाने फूस लावून पळवून आणल्याचे तपासात निष्पन झाले. या नंतर पोलिसांनी अल्पवयीन तरुणी व मोटारसायकल ताब्यात घेतली असून फरार तरुणाचा शोध सुरू केला आहे.

वेंगुर्ले पोलिस स्थानकाचे हवालदार रमेश तावडे, वाहतूक पोलिस मनोज परुळेकर, महिला पोलीस संतोषी सावंत, हवालदार श्री. हडकर, जिल्हा वाहतूक शाखेचे एएसआय पवार हे संयुक्त पेट्रोलिंग करीत असताना एक प्रेमीयुगुल मोटारसायकलने सागरी महामर्गावरुन गोवा ते मालवण प्रवास करत असताना आढळून आले. मोटारसायकलस्वाराची वर्तणूक संशयास्पद वाटल्याने वाहतूक पोलिसांनी मोटारसायकल थांबवून वाहनाची तपासणी व इतर चौकशी करण्यास सुरुवात केली. यावेळी संबंधित मोटारसायकलस्वार गाडी तेथेच सोडून लगतच्या निमुसगा जंगलात पळून गेला. पोलिसांनी यावेळी अल्पवयीन मुलीची चौकशी केली असता तिने आपण सातारा- फलटण येथील रहिवासी असून गोवा पहाण्यासाठी रविवार 12 जून रोजी मित्रा सोबत आल्याचे सांगितले.

पोलिसांनी याबाबत वेंगुर्ले पोलिस निरीक्षकांना माहिती दिल्यावर पोलिस निरीक्षक अतुल जाधव यांनी फलटण पोलिसांशी संपर्क साधला असता संबंधित तरुणाने अल्पवयीन युवतीस फुस लावून पळवून आणल्याचे उघड झाले. याबाबत युवतीच्या कुटुंबीयांनी फलटण पोलिस स्थानकात दिलेल्या तक्रारीवरून संबंधित युवकावर तेथे गुन्हा दाखल असल्याचे फलटण पोलिसांनी सांगितले. यानंतर पोलिसांनी संबंधित अल्पवयीन युवती व मोटारसायकल ताब्यात घेतली. तर फरार झाल्याला तरुणाचा शोध सुरू केला आहे. पोलिस निरीक्षक अतुल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. तालुक्यात नाकाबंदी केल्याने अशा प्रकारचा गुन्हा उघडकीस आला, अशी माहिती वाहतूक पोलिस मनोज परुळेकर यांनी दिली.

SCROLL FOR NEXT