Uncategorized

‘संभाजीनगर’ विरोधात आज मूकमोर्चा

सोनाली जाधव

औरंगाबाद, पुढारी वृत्तसेवा ः संभाजीनगर नामकरणाचा ठराव राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांना माहीत नव्हता, तर उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना कॅबिनेट बैठकीला गाणे ऐकायला बोलावले होते का, असा खोचक सवाल एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष खा. इम्तियाज जलील यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केला. दरम्यान, संभाजीनगर नामकरणाला विरोध असलेल्या एमआयएमसह विविध पक्ष, संघटनांच्या कृती समितीतर्फे मंगळवारी शहरातून दुपारी 2 वाजता भडकल गेट ते आमखास मैदान असा मूकमोर्चा काढण्यात येणार आहे. आमखास मैदानावर सर्वपक्षीय सभा घेऊन मोर्चाचा समारोप करण्यात येईल. नामकरणाचा निर्णयमान्य नव्हता, तर पक्षाचे /.. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील मंत्रिमंडळ बैठकीतून बाहेर का पडले नाहीत, असाही सवाल जलील यांनी केला. महाविकास आघाडी सरकारच्या शेवटच्या सभेत संभाजीनगरचा ठराव येणार, असे शिवसेनेचे मंत्री एक दिवस अगोदर जाहीर करतात. तरीही राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आता म्हणतात की, असा ठराव येणार हे माहितीच नव्हते. त्यांचे हे वक्‍तव्य हास्यास्पद असल्याची टीका करीत 'औरंगाबादचे नाव संभाजीनगर करायचे असेल, तर यावर जिल्ह्यातील नागरिकांचे मतदान घ्या, जनमत आम्ही मान्य करू,' असे आव्हान इम्तियाज जलील यांनी दिले.

या ठरावामुळे अडचणी निर्माण झाल्याने 'डॅमेज कंट्रोल'चे प्रयत्न पवार करीत आहेत. त्यासाठीच ते शहरात आले आहेत, असेही ते म्हणाले. राज्याची सत्ता जाईल आणि महापालिका निवडणुकीतही अडचणी येतील. केवळ ाच कारणामुळे शिवसेनेने संभाजीनगरचा ठराव घाईघाईत शेवटच्या सभेत मंजूर करून घेतला; परंतु यामुळे पर्यटनाची राजधानी असलेल्या औरंगाबादची ओळख मिटणारआहे. जगाच्या पाठीवर या शहराची वेगळी ओळख आहे, ती पुसण्याचे काम शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप करीत असल्याचा आरोप खा. जलील यांनी केला. जिल्ह्याचे नाव बदलायचे असेल, तर जागतिक पातळीवर ही प्रक्रिया करावी लागते. त्यासाठी किमान हजार कोटींचा खर्च येतो, असे ते म्हणाले.

काँग्रेस नेत्यांची भाजप बोली संभाजीनगर नावावर शिक्‍कामोर्तब झाल्यानंतर आता काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण म्हणतात की, जे झाले ते झाले. ज्या औरंगजेबाने संभाजी महाराजांची क्रूरपणे हत्या केली, त्याचे नाव बदलून संभाजीनगर केले. आता निर्णय झालेला आहे, असे नाना पटोले म्हणाले. एवढेच काय तर या ठरावाला आम्ही कुठल्याही प्रकारचा विरोध केलेला नाही, असे बाळासाहेब थोरात म्हणाले. त्यांची ही वक्‍तव्ये म्हणजे भाजपची बोलीच दिसते. ते आता केव्हाही भाजपवासी होतील, असा आरोप खा. जलील यांनी केला. बुधवारी शहरातून जनतादल, समाजवादी पार्टी, भारतीय दलित पँथर आदी पक्ष, संघटना मूकमोर्चा काढणार आहेत.

SCROLL FOR NEXT