Uncategorized

सोलापूर : श्रावणनिमित्त रेवणसिद्धेश्वर महाराज पालखी यात्रेस प्रारंभ

backup backup

सोलापूर : पुढारी वृत्तसेवा श्रावणनिमित्त सुमारे 200 वर्षांची परंपरा असलेल्या जगद्गुरू रेवणसिद्धेश्वर महाराजांच्या पालखी यात्रेस मोठ्या भक्तिभावात प्रारंभ झाला. श्रावण मासातील प्रत्येक रविवारी जोडभावी पेठतील चिद्रे वाड्यातून ही यात्रा काढण्यात येते. यंदा यात्रेनिमित्त आयोजित महापूजा पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे, रेवणसिध्द जवळेकर, यशवंत सादुल, माजी नगरसेवक उदय चाकोते, जगदीश पाटील, सुरेश पाटील, मल्लिनाथ शाबादे, राजेंद्र इंडे, गंगाधर यादवाड, गिरमलप्पा हिंगमिरे, शिवानंद ख्याडे, वीरेंद्र हिंगमिरे, बाबुराव अतनुरे, नरेंद्र होमकर, बाळासाहेब वाघमोडे यांच्या हस्ते करण्यात आली.

तद्नंतर जोडभावी पेठेतून कुंभार वेस, मंगळवार पेठ पोलिस चौकी, मधला मारुती विजापूर वेस गुरूभेटमार्गे विजापूर रोड येथील श्री रेवणसिद्धेश्वर मंदिरात पालखीचे आगमन झाले. शेवटच्या रविवारी रथाचे व पालखीचे भव्य मिरवणूक काढण्यात येते. याप्रसंगी उत्सव समितीचे अध्यक्ष गुरूराज पदगोंडा, योगेश परचंडे, मंथन चिडगुंपी, ऋषिकेश हिंगमिरे, रोहन बिद्री, सुरेश धनश्री, चिदानंद बगले, सिद्धराम कलशेट्टी, हेमंत तुगावे, सिद्धाराम स्वामी, चिदानंद बगले, योगेश चिट्टे, अभिजित स्वामी, वीरेश वारद, श्रीशैल जक्कापुरे, भाग्येश ख्याडे, मल्लिनाथ कलशेट्टी, बसवराज मठपती, नागराज बिराजदार, सागर आतनुरे, आशिष दुलंगे, मल्लिनाथ सोलापुरे, कैलास चाकोते, जगदीश होनराव, अक्षय अंजिखाने आदी उपस्थित होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT