Uncategorized

शेतकर्‍यांच्या हिताचा एक तर निर्णय घ्या

backup backup

सोलापूर : पुढारी वृत्तसेवा शेतकर्‍यांची बाजार समिती असताना येथील कर्मचार्‍यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला. तसेच त्याचा फरक, महागाई भत्ता या सर्व सोयी-सुविधा दिल्या जात आहेत. परंतु शेतकर्‍यांच्या जीवावर चालणारी बाजार समिती असून देखील शेतकर्‍यांच्या हिताचा एकही निर्णय घेतला जात नसल्याची खंत बाजार समितीचे संचालक प्रकाश चोरेकर यांनी व्यक्त केली. सभापती विजयकुमार देशमुख अनुपस्थित असल्यामुळे सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे मासिक बैठक उपसभापती श्रीशेल नरोळे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्याप्रसंगी ते बोलत होते.

पुढे बोलताना चोरेकर म्हणाले, शेतकर्‍यांना बाजार समितीकडून कॅरेट मिळावे यासाठी गेल्या अनेक वर्षापासून विषय मांडून देखील अद्याप मिळालेले नाही. तसेच शेतकर्‍यांच्या हिताचा कोणत्याही प्रकारे निर्णय घेतला जात नाही. मात्र येथील अडत दुकानदार व कर्मचार्‍यांचा विषय मात्र बाजार समितीकडून लगेच मार्गी लावला जातो. परंतु शेतकर्‍यांच्या प्रश्नाबाबत कोणीच ब्र शब्द काढत नसल्याची खंत याप्रसंगी चोरेकर यांनी व्यक्त केले.याबरोबरच या बैठकीमध्ये इ – नाम योजनेच्या कर्मचार्‍यांना पगार वाढीचा विषय मांडण्यात आला परंतु सभापती आल्यानंतर या विषयावर चर्चा केली जाईल असेही संचालकांनी सांगितले. या बैठकी प्रसंगी संचालक अमर पाटील, वसंत पाटील, नामदेव गवळी, राजकुमार वाघमारे, बाळासाहेब शेळके, बसवराज इटकळे, शिवानंद पुजारी आदी संचालक उपस्थित
होते.

SCROLL FOR NEXT