Uncategorized

शिक्रापूर : टँकर धडकेने पिकअप चालकाचा मृत्यू

अमृता चौगुले

शिक्रापूर : पाबळ (ता. शिरूर) येथील पाबळ लोणी रस्त्यावर पेट्रोल वाहतूक करणारा टँकर व पिकअपची धडक होऊन झालेल्या अपघातात पिकअप चालक सुनील हनुमंत लोणकर (वय 26 वर्षे, रा. पारगाव शिंगवे, ता. आंबेगाव) याचा मृत्यू झाला. या प्रकरणी शिक्रापूर पोलिस ठाण्यात सय्यद जाफर शेख (रा. सय्यदनगर, हडपसर, ता. हवेली) या टँकर चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पाबळ-लोणी रस्त्याने लोणकर हा दि. 1 जुलै रोजी पिकअपने(एमएच 14 ईएम 6768) तरकारी माल घेऊन जात होता. समोरून आलेल्या हिंदुस्तान पेट्रोलियम कंपनीच्या भरधाव टँकरने (एमएच 12 केपी 2359) पिकअपला धड़क दिली. त्यात पिकअप चालक लोणकर हा गंभीर जखमी झाला. या वेळी येथील नागरिकांनी त्याला उपचारासाठी शिक्रापूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तेथील डॉक्टरांनी लोणकर याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे घोषित केले.

याबाबत मंगेश हनुमंत लोणकर (वय 24 वर्षे, रा. पारगाव शिंगवे, ता. आंबेगाव, जि. पुणे) यांनी शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे. त्यानुसार शिक्रापूर पोलिसांनी टँकरचालकावर गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस उपनिरीक्षक विजय चौधर करीत आहेत.

SCROLL FOR NEXT