Uncategorized

सोलापूर : विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे झाले कमी

backup backup

सोलापूर ः पुढारी वृत्तसेवा इयत्ता पहिलीच्या अभ्यासक्रमातील चार विषयांचा अभ्यासक्रम एकाच पुस्तकात समाविष्ठ करण्यात आला आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या पाठीवरचे पुस्तकांचे ओझे कमी झाले आहे. सुरुवातीला ही पद्धत इयत्ता पहिलीसाठी सुरू करण्यात आली आहे. पुढील वर्षापासून सर्व प्राथमिक वर्गांसाठी लागू केली जाणार आहे. सोलापुरात या विद्यार्थ्यांसाठी शाळेत कपाटे आणून त्यामुळे दप्‍तर ठेवण्याची सोय केली आहे. त्यामुळे मुलांच्या पाठीवरील दप्‍तराचे ओझे कमी झाले आहे.

यंदाच्या सन 2022-2023 या शैक्षणिक वर्षापासून मुलांच्या पाठीवरील दप्‍तरांचे ओझे कमी करण्याचा प्रयत्न राज्य शासनाने केला आहे. चार विषयांसाठी एकच एकामित्क पुस्तक, यासाठी तयार करण्यात आले असून, त्याचे मोफत वितरणही मुलांना करण्यात आले आहे.
इयत्ता पहिलीमध्ये शिकवले जाणारे इंग्रजी, मराठी, गणित आणि खेळा आणि शिका या प्रत्येक सत्रासाठी एका पाठ्यपुस्तकात एकत्रित केले गेले आहेत. प्रत्येक विषयाचे पाठ्यपुस्तक वेगळे घेऊन जाण्याऐवजी विद्यार्थ्याने सत्रानुसार भाग 1, 2, 3 किंवा 4, असे फक्त एक पाठ्यपुस्तक बाळगणे आवश्यक आहे. हे दप्तर ठेवण्यासाठी बहुतांश शाळांत मुलांना कपाटे उपलब्ध करुन देण्यात आली आहेत.

जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून कपाटाची खरेदी दरवर्षी करण्यात येत आहे. मुलांच्या पाठीवरील ओझे कमी करण्यासाठी विविध वह्यांचेही एकत्रिकरण करण्यात आले आहे. गणित, उपक्रम व चित्रकला यासारख्या विषयांना लागणार्‍या वह्या एकत्रित करून मुलांच्या पाठीवरील ओझे यंदाच्या वर्षापासून कमी करण्यात आले आहे. या निर्णयाचे पालकांतून स्वागत होत आहे.

मुलांचे ओझे कमी करण्यासाठी प्रयत्न : लोहार

यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून शासनाने मुलांच्या खांद्यावरील दप्‍तराचे ओझे कमी केले आहे. यासाठी एकात्मिक पुस्तके पहिलीच्या मुलांसाठी वितरित करण्यात आली आहेत. पुढील वर्षापासून सर्व विद्यार्थ्यांना अशी पुस्तके वितरित होतील. अन्य शैक्षणिक साहित्यांचीही विभागणी करुन मुलांचे ओझे कमी करण्यात आल्याची माहिती शिक्षणाधिकारी डॉ.किरण लोहार यांनी दिली.

SCROLL FOR NEXT