Uncategorized

लोणावळा : भुशी धरण परिसर पर्यटकांनी फुल्ल

अमृता चौगुले

लोणावळा : लोणावळा शहरात शनिवारी सकाळी 7 ते रविवारी सकाळी 7 या 24 तासात 135 मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली. विशेष म्हणजे यातील 100 मिलिमीटर पावसाची नोंद ही केवळ शनिवारी सायंकाळी 5 वाजेपर्यंत म्हणजे केवळ पहिल्या 10 तासात झाली होती. एकीकडे मुसळधार पाऊस पडत असताना दुसरीकडे भुशी धरणावर रविवारी सकाळपासून पर्यटकांनी मोठी गर्दी केली होती.

धरणाकडे जाणार्‍या मार्गावर पर्यटकांनी मोठी गर्दी केल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र पहायला मिळाले. वाहनांच्या सोबत पायी जाणार्‍यांची संख्या देखील रविवारी मोठी होती. शनिवारी रात्रीपासून पावसाने लोणावळा परिसरात उसंत घेतली आहे. मागील पाच ते सहा दिवस जोरदार पाऊस पडल्याने लोणावळा जलमय झाला होता. शनिवारी देखील शहरात मोठ्या प्रमाणात पर्यटक आल्याने प्रचंड वाहतूककोंडी झाली होती. रविवारी देखील धरणाच्या पायर्‍यांवर बसून वर्षाविहाराचा आनंद घेताना पर्यटक दिसत होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT