राशिभविष्य  
Uncategorized

राशिभविष्य : मेष, सिंह, कन्या, मकर राशिगटाला उत्तम

backup backup

राशिभविष्य या सप्ताहात मेष, सिंह, कन्या, मकर, राशिगटाला उत्तम आहे, तर या सप्ताहात राशिभविष्य कर्क, वृश्चिक, मीन, गट कनिष्ट फलदायी राहील. हे राशिभविष्य ११ जुलै ते १७ जुलै २०२१ पर्यंत असेल. होराभूषण रघुविर खटावकर यांनी दिलेल्या पंचांगानूसार राशिभविष्य देण्यात आले आहे. राशिप्रवेश : दि. 16 रवि कर्केत 16/53, 17 – शुक्र सिंहेत 9/26, महत्त्वाचे ग्रहयोग : दि. 12 बुध त्रिकोण गुरु, 13 – शुक्र युती मंगळ, 15 – रवि त्रिकोण नेपच्युन, 16 – शुक्र षडाष्टक नेपच्युन, 17 – रवी प्रतियुति प्लुटो. वक्री ग्रह : गुरु, शनि, प्लुटो.

मेष : कामात यश मिळेल

बुध, दि. 16 अखेर पर्यंत रवी दुसरे. महत्त्वाच्या कामात यश मिळेल. भावंडांचे सौख्य लाभेल. विकासासाठी नवीन उपाययोजना कराल. प्रॉपर्टीची कामे होतील. वाहन खरेदी कराल. अधिकार असतील. पोटाची तक्रार राहील. विवाह जुळेल. सप्ताहाच्या सुरुवातीला गृहसौख्य लाभेल. संतती सौख्य लाभेल. सप्ताहाच्या शेवटी अपेक्षेपेक्षा मोबदला कमी मिळेल. वाद टाळा.

वृषभ : आर्थिक प्राप्ती जेमतेम

बुध दि. 16 अखेरपर्यंत रवी दुसरे. आर्थिक प्राप्ती जेमतेम राहील. शिक्षणामुळे चांगल्या अधिकाराची नोकरी मिळेल. अतिमहत्त्वाकांक्षी राहाल. गुणवत्ता वाढवा. सुवर्णालंकारांची खरेदी कराल. कायदेशीर बाबी सांभाळा.

सप्ताहाच्या सुरुवातीला गाठीभेटी, प्रवास इ.साठी खूप धावपळ होईल. गृहसौख्य लाभेल. सप्ताहाच्या शेवटी दुर्लक्ष झाल्यास कामे बिघडतील.

मिथुन : धाडसामुळे लाभ

बुध दि. 16 अखेर प. रवी पहिले. तुमच्या धाडसाचे कौतुक होईल. आर्थिक लाभ होईल. महत्त्वाकांक्षी बनाल. धंदा व्यवसायात चैतन्य आणाल. विवाह जुळेल. संतती होईल. आरोग्य व करिअर या दोन्ही बाबतीत त्रास संभवतो.

सप्ताहाच्या सुरुवातीला कौटुंबिक खर्चासाठी पैसा उपलब्ध होईल. एक-दोन दिवस गाठीभेटी, प्रवास इ.साठी खूप धावपळ होईल. सप्ताहाच्या शेवटी मनोबल कमी राहील.

कर्क : मोठे खर्च निघतील

बुध दि. 16 अखेर प. रवी 12 वे. मोठे खर्च निघतील. धंदा व्यवसायात स्पर्धा वाढेल. कुटुंबात मनमानी कराल. कामासाठी जवळचे, दूरचे, परदेशात प्रवास घडेल. दुसर्‍याला कमी समजू नका. सप्ताहाच्या सुरुवातीला महत्त्वाकांक्षा वाढेल. कौटुंबिक गरजा भागवाल. सप्ताहाच्या शेवटी गाठीभेटी, प्रवास इ.साठी खूप धावपळ होईल.

सिंह : अपेक्षेप्रमाणे मोठे आर्थिक लाभ

बुध दि. 16 अखेर प. रवी 11 वे. अपेक्षेप्रमाणे बुद्धीकौशल्याने मोठे आर्थिक लाभ होतील. गुप्त कारस्थानांचा त्रास संभवतो. गैरसमज हातील. नैतिक आचरण बिघडू देऊ नका. सप्ताहाची सुरुवात खर्चाने, चैनीने, चिडचिडीने होईल. कामे रेंगाळली तरी एक-दोन दिवसांत ती पूर्ण करू शकाल. सप्ताहाच्या शेवटी कौटुंबिक गरजा व समस्यांकडे लक्ष देऊ शकाल.

कन्या : कामाचे कौतुक होईल

बुध दि. 16 अखेरपर्यंत रवी 10 वे. वरिष्ठांची मर्जी राहील. कामाचे कौतुक होईल. बक्षिसे मिळवाल. चुकीचे औषध घेतल्यामुळे त्रास संभवतो. पती-पत्नींनी संभाषणात वादाचे विषय टाळावेत. विपरीत बुद्धी होईल. सप्ताहाच्या सुरुवातीला आर्थिक लाभाच्या घटना घडतील. एक-दोन दिवस खर्चाचे कंटाळवाणे जातील. सप्ताहाच्या शेवटी रेंगाळलेली कामे पूर्ण कराल.

तूळ : भाग्यकारक अनुभव

बुध दि. 16 प. रवी नववे. भाग्यकारक अनुभव येतील. मोठे आर्थिक लाभ होतील. कामासाठी घरापासून दूर जावे लागेल. अपेक्षेप्रमाणे लाभ होतील. शिक्षणात प्रगती होईल.

विवाह जुळेल. सप्ताहाच्या सुरुवातीला कार्यसाफल्याचा आनंद मिळेल. आर्थिक लाभाच्या घटना घडतील. सप्ताहाच्या शेवटी खर्च वाढेल. कामे रेंगाळतील. मनोबल कमी राहील.

वृश्चिक : शारीरिक दगदग

बुध दि. 16 प. रवी आठवे. शारीरिक दगदग खूप होईल. धंद्याकडे दुर्लक्ष झाल्यास नुकसान होऊ शकेल. कामाचे नियोजन चांगले राहील. निर्णायक कामात यश मिळेल. सप्ताहाच्या सुरुवातीला भाग्यकारक अनुभव येईल.
मानसन्मान लाभेल. सप्ताहाच्या शेवटी मोठे आर्थिक लाभ संभवतात. मित्रांचा सहवास लाभेल.

धनु : जोडीदाराचा सल्ला उपयुक्त राहील

बुध दि. 16 प. रवी सातवे. जोडीदाराचा सल्ला उपयुक्त राहील. अहंकार सोडा. परदेशाशी संबंधित व्यवहारातून लाभ संभवतो. भाऊबंदकी जाणवेल. प्रॉपर्टीत पैसे गुंतवाल.

प्रशिक्षणासाठी परदेशगमनाची संधी लाभेल. सप्ताहाच्या सुरुवातीला सर्दी, पडसे, शारीरिक थकवा जाणवेल. भावंडांशी संपर्क होईल. सप्ताहाच्या शेवटी कार्यसाफल्याचा आनंद मिळेल.

मकर : बुद्धिकौशल्याने यश

बुध दि. 16 प. रवी सहावे. बुद्धिकौशल्याने कामे यशस्वी होत राहतील. आपले विचार क्रांतिकारक असतील. विवाह जुळेल. कर्जफेडीची सुरुवात करू शकाल. शैक्षणिक बाबीत गाफील राहू नका.

सप्ताहाच्या सुरुवातीला कामासाठी प्रवास घडेल. एक-दोन दिवस सर्दी-पडसे, थकवा जाणवेल. सप्ताहाच्या शेवटी मनोबल वाढेल. प्रवास घडेल.

कुंभ : बौद्धिक क्षेत्रात यश

बुध दि. 16 प. रवी पाचवे. बौद्धिक, कला, शैक्षणिक क्षेत्रात यश मिळेल. परदेशगमनाची संधी लाभेल. जवळच्या व्यक्तींना दुखवू नका. परदेशाशी संबंधित व्यवहारातून फायदा होईल. सप्ताहाच्या सुरुवातीला सर्दी, पडसे, थकवा जाणवेल.

कामात अडथळे, विलंब अनुभवाल. वरिष्ठांची मर्जी सांभाळा. सप्ताहाच्या शेवटी कामाचे समाधान मिळेल. पण अधिकार नीट चालणार नाहीत.

मीन : घरगृहस्थीची काळजी घ्या

बुध दि. 16 प. रवी चौथे. घरगृहस्थीची काळजी राहील. मन उद्विग्न राहील. स्पर्धकांचा अंदाज घ्या.

परदेशगमनाची संधी लाभेल. मित्रामुळे मोठ्या भानगडीत अडकण्याची शक्यता राहील. सप्ताहाच्या सुरुवातीला संततीसौख्य लाभेल.

आव्हानात्मक कामे कराल. पण मोबदला कमी मिळेल. वाद टाळा. सप्ताहाच्या शेवटी सहकार्याचे वातावरण लाभेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT