Uncategorized

महाराष्ट्र राज्य प्राथमिक संघाच्या शिष्टमंडळाची लवकरच बैठक बोलवू : वर्षाताई गायकवाड

backup backup

महाराष्ट्र राज्य प्राथमिक संघाच्या शिष्टमंडळाबरोबर शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नाबाबत चर्चा करण्यासाठी लवकरच बैठक बोलवू असे आश्वासन शालेय शिक्षणमंत्री वर्षाताई गायकवाड यांनी दिले .

शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नाचे निवेदन वर्षाताई गायकवाड यांना दिले. बऱ्याच वर्षापासून प्रलंबित असणारे प्रश्न सोडविण्याच्या द्रुष्टीने शिक्षक संघाच्या शिष्टमंडळास वेळ देवून हे प्रश्न सोडवावेत अशी विनंती श्री. राजेश वाघमारे सर यांनी केली. ही विनंती मान्य करून लवकरात लवकर बैठकीची तारीख देवू असे आश्वासन मंत्री वर्षाताई गायकवाड यांनी दिले.

या आहेत मागण्या

१.२००५ नंतर नियुक्त शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी.

२.प्राथमिक शिक्षण सेवकांचे सेवकांनी मानधन वाढवून ३०००० व माध्यमिक
शिक्षण सेवकांची मानधन वाढवून ४०००० हजार रुपये करण्यात यावे.

३. सातव्या वेतन आयोगातील त्रुटीचे निराकरण करून खंड दोन प्रकाशित करावा.

४. स्थानिक स्वराज्य संस्थेतील इयत्ता इयत्ता पहिली ते आठवीच्या आठवीचे सर्व विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांना मोफत गणवेश देण्यात यावा.

५.वीसपेक्षा कमी पट असलेल्या शाळा बंद करण्यात येऊ नयेत.

६. शिक्षकांना वैद्यकीय उपचारासाठी कॅशलेश सुविधा उपलब्ध करून द्यावी.

७. प्राथमिक शिक्षकांच्या पाल्यांच्या उच्च शिक्षणासाठी आर्थिक फी माफीची तरतूद करावी .

८.वरिष्ठ व निवड वेतनश्रेणीसाठी शिक्षकांना १०-२०-३० हि अश्वाशीत योजना
लागू कारवी.

९.इयत्ता पहिली ते सातवी/आठवी पर्यंतच्या शाळांना विनाअट मुख्याध्यापक
देण्यात यावा.

१०.जिल्हा परिषदेच्या शाळेला सेवकाचे पद मान्य करण्यात यावे.

११.सुधारित संचमान्यता निकषानुसार अनेक चंगल्या मोठ्या शाळा मोडकळीस येऊन सरकारी शाळांची पत घसरेल तेव्हा 200 पटावरील ( इ.१ली ते ५ वी ) ३० पाटस एक शिक्षक मिळावा.शिवाय निकष पूर्वीप्रमाणे कायम ठेवावेत.

१२.शिक्षक बदल्यासाठी ३१ मे ऐवजी ३० जून बदलीपात्र तारीख असावी.

१३.प्रशासकीय बदलीसाठी एकाशाळेत ५ वर्षे पूर्ण सेवाकालावधी धरावा .

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT