सोलापूर ः पुढारी वृत्तसेवा नियमित कर्जाची परतफेडची जिल्हा बँकेने 40 हजार शेतकर्यांची यादी शासनाकडे पाठविली होती. त्यामधील केवळ 8 हजार 96 शेतकरीच पात्र झाले असनू जवळपास 32 हजार शेतकरी प्रोत्साहान योजनेमधून अपात्र झाले आहेत. त्यामुळे कर्जाची परतफेड करणार्या शेतकर्यांना फटका बसला आहे. राज्य शासनाने जे शेतकरी नियमित कर्जाची परतफेड करतात. अशा शेतकर्यांना 50 हजार रूपयाचे प्रोत्साहान अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे.
जेणेकरून नियमित कर्जाची परतफेड करणार्या शेतकर्यांना प्रोत्साहन मिळावे म्हणून शासनाने ही योजना सुरू केली आहे. त्यासाठी पात्र शेतकर्यांची यादी जिल्हा बँकेने शासनाकडे पाठविली होती. यामध्ये 45 हजार शेतकर्यांची पाठविण्यात आली होती. परंतु शासनाने यामधील केवळ 8 हजार 96 शेतकरीच प्रोत्साहानसाठी पात्र ठरिवले आहे. अपात्र करण्यात आलेल्या शेतकर्यांमध्ये नियमित कर्जाची परतफेड करणे आणि सन 2017 ते 20 पर्यंत नियमित कर्ज काढणे आणि कर्जाची परतफेड करणे आवश्यक आहे. यामध्ये काही शेतकर्यांनी पहिले वर्ष कर्जाची परतफेड केले तर दुसर्या वर्षी परतफेड केले नाहीत. त्यामुळे असे जवळपास 32 हजार शेतकरी निघाल्याने अपात्र झाले आहेत.
दरम्यान जे शेतकरी 50 हजार आणि त्यापेक्षा जास्त कर्ज काढून परतफेड केले असेल अशा शेतकर्यांना सर्वाधिक 50 हजार रूपये प्रोत्साहान म्हणून देण्यात येणार आहे. तर 50 हजारापेक्षा कमी रक्कम कर्ज घेवून परतफेड केले असेल तर अशा शेतकर्यांना 50 हजारापेक्षा कमी प्रोत्साहान अनुदान मिळणार आहेत. दरम्यान जुलै महिन्यात नियमीत कर्जाची परतफेड करणार्या शेतकर्यांना शासनाने अनुदान देण्याचे जाहिर केले होते. मात्र सद्या राज्यातील राजकीय हालचालीमुळे विलंब होण्याची शक्यता आहे.
प्रोत्साहान अनुदान योजनेसाठी आम्ही 45 हजार शेतकर्यांची यादी शासनाकडे पाठविली होती. त्यापैकी केवळ 8 हजार 96 शेतकर्यांना पात्र केले आहे. त्यामुळे शासकीय निकषामुळे उर्वरीत खातेदार अपात्र झाले आहेत.
– विलास देसाई,
मुख्य कार्यकारी अधिकारी