पैठण, पुढारी वृत्तसेवा : पैठण तालुक्यातील आपेगाव रोडवर शनिवारी रात्री नऊच्या सुमारास अज्ञात ट्रॅक्टरने मोटर सायकलला जोरदार धडक दिली. या अपघातात मोटरसायकलस्वार जागीच मृत झाला. मृत झालेल्या व्यक्तीचे नाव संतोष सुभाष लंगोटे (वय 35 , रा. भांबेरी ता. अंबड) असे आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पैठण येथील एका जागरण गोंधळ कार्यक्रमासाठी गाडी क्र. (MH 21.BP 1243) या मोटर सायकलीवरून संतोष लंगोटे पैठणकडे जात होते. पैठण रोडवरील आपेगाव येथे अज्ञात ट्रॅक्टरने धडक दिली. या अपघातात संतोष लंगोटे याचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेची माहिती पैठण पोलीसांना मिळताच घटनास्थळी दाखल झाले. लंगोटेचा मृतदेह पैठण सरकारी दवाखान्यात नेण्यात आला. तर फरार झालेल्या वाहनाचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. या अपघाताची नोंद पैठण पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील पोलिस करत आहेत.
हेही वाचा