Uncategorized

पुणे : महागडे फोन मागवले; मिळाले रिकामे बॉक्स

अमृता चौगुले

चाकण, पुढारी वृत्तसेवा : अ‍ॅमेझॉनवरून अ‍ॅपल व वनप्लससारखे महागडे फोन मागवणार्‍या ग्राहकांना रिकामे बॉक्स मिळाले आहेत. याप्रकरणी पिकिंग व पॅकिंग करणार्‍या कंपनीच्या कर्मचार्‍यावर महाळुंगे पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार आंबेठाण (ता. खेड) येथे घडला.

सुहेल हरून तांबोळी (रा. सोलापूर शहर) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सुशील उदयसिंहराव गायकवाड (वय 37, रा. बावधन, ता मुळशी) यांनी महाळुंगे पोलिसांत तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिकिंग व पॅकिंग डिपार्टमेंटमधून वस्तूंची पॅकिंग करून ग्राहकांना पाठवले जात असताना पॅकिंगमधून महागडे मोबाईल फोन आणि घड्याळ काढून एका कामगाराने मोकळे बॉक्स ग्राहकांना पाठवले. फिर्यादी हे अ‍ॅमेझॉन सेलर सर्व्हिसेस कंपनीत काम करतात. त्यांच्या कंपनीतून ग्राहकांनी ऑनलाइन ऑर्डर केलेल्या वस्तूंना पॅकिंग करून पुढे डिलिव्हरीसाठी पाठवले जाते.

आरोपी हा कंपनीत काम करीत होता. त्याने ग्राहकांना जाणार्‍या पॅकिंग वस्तूंची पॅकिंग खोलून त्यातून दोन अ‍ॅपल कंपनीचे आयफोन, एक वन प्लस मोबाईल व एक गोकी स्मार्ट वॉच असा 1 लाख 84 हजार 338 रुपयांचा माल काढून ग्राहकांना रिकामे बॉक्स डिलिव्हरीसाठी पाठवले. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाळुंगे पोलिस तपास करीत आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT