Uncategorized

पालकांच्या स्वप्नपूर्तीसाठी विद्यार्थ्यांनी परिश्रम घ्यावेत

backup backup

माढा : पुढारी वृत्तसेवास ज्या आईवडिलांनी मोठ्या कष्टाने आपल्याला वाढवले, शिकवले त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी विद्यार्थ्यांनी परिश्रम घेत ध्येय गाठण्याचे आवाहन जिल्हा युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष दादासाहेब साठे यांनी केले. माढ्यातील सहकार महर्षी गणपतराव साठे जिल्हा परिषद प्रशालेतील दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ नुकताच पार पडला. यावेळी ते बोलत होते. माढ्यात सहकार महर्षी गणपतराव साठे यांनी स्वातंत्र्य पूर्व काळात जिल्हा लोकल बोर्डाच्या माध्यमातून ही शाळा उभा केली. माध्यमिक सह महाविद्यालयीन शिक्षणासाठीही जमीन देऊन संस्था उभारणीत मोलाची भूमिका सहकारमहर्षी नी बजावल्याने या परिसरातील सर्वसामान्यांच्या मुलांना शिक्षणाची दारे खुली झाली. म्हणूनच या दुष्काळी पट्ट्यातील नागरिकांचे जीवनमान उंचावले आहे.

यश मिळवलेल्या विद्यार्थ्यामध्ये बहुतांश मुले ही सर्वसामान्य शेतकरी कुटूंबातिल असल्याचा मनस्वी आनंद होतो आहे. विद्यार्थीदशेत आमचा सन्मान नाही झाला पण इतरांचा सन्मान करण्याची संधी ही याच प्रशालेने आम्हाला दिली असल्याने या प्रशालेचा सार्थ अभिमान असून प्रशालेच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन देऊन यशस्वी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी नगराध्यक्षा अ‍ॅड. मिनल साठे यांनी कोरोनासारख्या संकटानंतर विद्यार्थ्यांनी मिळवलेले यश हे संकटावरती मात करून ध्येय साध्य करण्याचा आत्मविश्वास कमावल्याचे द्योतक असल्याचे सांगितले.प्रशालेच्या इमारतीचा प्रश्न रिक्त पदांचा प्रश्न सोडवण्यासाठी सर्वानी मिळून प्रयत्न करण्याची गरज व्यक्त केली.

यावेळी नगरपंचायतीचे बांधकाम समिती सभापती अरूण कदम, शाळा व्यवस्थापन समिती अंकुश गोरे, सुप्रिया बंडगर, दत्ताजी शिंदे, नागेश खेडकर, के.डी. यादव यांच्यासह गुणवंत विद्यार्थी व त्यांचे पालक उपस्थित होते. सूत्रसंचालन भरत डुचाळ तर आभार लक्ष्मण राऊत यांनी मानले.

SCROLL FOR NEXT