Uncategorized

पळून गेलेल्या ‘त्या’ आरोपीस अटक

backup backup

करमाळा: पुढारी वृत्तसेवा जेलमधील सजा भोगणार्‍या व सुट्टीवर गावी येऊन परागंदा झालेल्या कैदी असलेल्या आरोपीस करमाळा पोलिसांनी सापळा रचून अटक केली. मोतीराम मरीबा ओहोळ (रा. मिरगव्हाण) असे आरोपीचे नाव आहे. ही कारवाई करमाळा पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली अमोल जगताप, सोमनाथ जगताप, हवालदार चंद्रकांत ढवळे,सिध्देश्वर लोंढे यांनी केली.

याबाबत ची हकीकत अशी की, मोतीराम मरीबा ओहोळ याला सात वर्षाची शिक्षा झाली होती. शिक्षा भोगत असताना कोव्हिड काळात पंचेचाळीस दिवस व 690 दिवस कोरोना काळ अशी रजा त्याने मिळवली होती. यानंतर आरोपी मोतीराम हा गावाकडे घरी भावाकडे पवन मरिबा ओहोळ यांच्याकडे गेला. मात्र रजा संपल्यानंतर येरवडा कारागृहात आलाच नाही. येरवडा कारागृहाचे पोलिस समाधान काशीनाथ जाधवर यांनी दिलेल्या फिर्यादी नुसार कलम 224 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. मोतीराम याला डोणजे तालुका परांडा जिल्हा उस्मानाबाद या ठिकाणांहून सापळा रचून ताब्यात घेतले. पुढील तपास हवालदार अझहर शेख बालाजी घोरपडे हे करीत
आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT