भोपाळ; वृत्तसंस्था : मध्य प्रदेशचे वनमंत्री विजय शाह यांच्या गॅस एजन्सीत 10 हजार रुपये महिन्यांची नोकरी करणार्या बिशू भालेरावच्या बँक खात्यात 16 लाख रुपये, तर नावावर कोट्यवधींची संपत्ती असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे.
बिशूच्या 4 बायकांची 4 वेगवेगळी घरे असून, गॅस एजन्सी मालक शहांच्या तक्रारीवरून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. तो फरार असून, लवकरच त्याची वरात काढली जाईल, असे तपासाधिकार्याचे म्हणणे आहे.