Uncategorized

पंढरपूर : माघी वारीतून विठ्ठल मंदिर समितीला सव्वा कोटीचे उत्पन्न

Arun Patil

पंढरपूर ; पुढारी वृत्तसेवा : कोरोनानंतर तब्बल दोन वर्षांनी लाखो भाविकांच्या उपस्थितीत माघी यात्रा पार पडली. यामुळे श्रींच्या दानपेटीत भाविकांनी भरभरून दान केले. देणगीदेखील मोठ्या प्रमाणात जमा झाली आहे. फोटोफ्रेम, हुंडी पेटी व ऑनलाईनच्या माध्यमातून जमा झालेल्या देणगीत मोठी भर पडली आहे. यामुळे श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीला माघी यात्रा (पंढरपूर) सव्वा कोटी रुपयांनी पावली आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद ठेवण्यात आले होते. वर्षभरातील चैत्री, माघी, कार्तिकी व आषाढी या चार महत्त्वाच्या यात्रा भाविकांविना केवळ परंपरा खंडित होऊ नये, म्हणून मर्यादित भाविकांच्या उपस्थितीत पार पडल्या.

त्यामुळे दोन वर्षांत मंदिर समितीचे आर्थिक उत्पन्न ठप्प झाले होते. केवळ ऑनलाईन देणगीच्या माध्यमातूनच उत्पन्नात भर पडत होती. तर दुसर्‍या लाटेनंतर कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यामुळे घटस्थापनेच्या मुहूर्तावर मुखदर्शन सुरू करण्यात आले. यामुळे मंदिर समितीचे आर्थिक उत्पन्न वाढू लागले आहे.

माघी यात्रा भरवण्यास शासनाने परवानगी दिल्याने भाविकही लाखोंच्या संख्येने यात्रेला आले. माघी यात्रेत दि. 2 फेब्रुवारी ते 16 फेब्रुवारी या दरम्यान मंदिर समितीला एकूण 1कोटी 24 लाख 45 हजार 233 रुपयांचे आर्थिक उत्पन्न मिळाले आहे. यात देणगी स्वरुपात सर्वाधिक 43 लाख 75 हजार 25 रुपये जमा झाले आहेत. तर त्याखालोखाल हुंडी पेटीत 34 लाख 58 हजार 364 रुपये जमा झाले आहेत.

तर फोटो विक्रीतून 131675 रुपये, वेदांत भक्तनिवास129050 रुपये, व्हिडीओकॉन भक्तनिवास 91200,श्री विठ्ठल रुक्मिणी भक्त निवास 1078430, मोबाईल लॉकर 220320, परिवार देवता 2175313, ऑनलाईन जमा 647808 तर इतर 138048 रुपये असे एकूण 1 कोटी 24 लाख 45 हजार 233 रुपये आर्थिक उत्पन्न मिळालेले आहे.

दि. 12 फेब्रुवारी रोजी माघ यात्रेचा मुख्य एकादशीचा सोहळा पार पडला. मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, कार्यकारी अधिकारी तथा प्रांताधिकारी गजानन गुरव, मंदिर समितीचे सदस्य व व्यावस्थापक बालाजी पुदलवाड यांनी यात्रा सोहळा निर्विवादपणे पार पाडला आहे. मागील वर्षीच्या माघ यात्रेच्या तुलनेत या वर्षीच्या माघ यात्रेच्या उत्पन्ना 50 लाख 84 हजार 448 रुपयांचे उत्पन्न जास्त आहे. म्हणजेच 60 टक्के आर्थिक उत्पन्न जादा मिळाले आहे.

माघ यात्रा 2021/2022 तुलनात्मक आकडे

खाते                                      2021              2022
देणगी                                    1253864        4375025
फोटो विक्री                             63475           131675
वेदांत भक्तनिवास                    94550           129050
व्हिडीओकॉन भक्त निवास        69200           91200
श्री विठ्ठल रुक्मिणी भक्त निवास  760310        1078430
मोबाईल लॉकर                       171195        220320
हुंडी पेटी                               3620756       3458364
परिवार देवता                         806261        2175313
ऑनलाईन जमा                      293170        647808
इतर                                     227944        138048
एकूण                                   7360725      12445233

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT