Uncategorized

पंढरपूर नगरपालिकेसमोरच रस्त्यावर खड्डा

backup backup

पंढरपूर : पुढारी वृतसेवा नगर पालिकेसमोरच रस्त्यावर भलामोठा खड्डा पडल्याने दुकानदार, वाहनधारक व नागरिकांमधून एकच खळबळ उडाली. शुक्रवारी दुपारी 1 वाजता रस्त्यावर उभा केलेल्या टमटमच्या चाकाखालील जमीन अचानक दबली गेली. प्रसंगावधान राखत चालकाने टमटम बाजुला केल्याने मोठा अनर्थ टळला आहे. वरुन छोटा दिसत असला तरी खड्डा 15 फुट खोल व आत रुंदीलाही मोठा आहे. याची माहिती मिळताच नगरपालिकेने त्वरीत जेसीबी व टिपरच्या सहाय्याने मुरुम टाकून खड्डा बुजवला आहे.

सध्या पावसाळी वातावरण सुरु झाले आहे. तत्पूर्वीच खड्डा पडला आहे. जर भर पावसात खड्डा पडला असता तर पावसाच्या पाण्यात दिसून आला नसता. त्यामुळे यात दुचाकी व इतर वाहने अडकून मोठा अनर्थ घडू शकला असता. मात्र, पावसाळ्यापूर्वीच खड्डा पडला आणि तोही भर दुपारी पडल्याने दक्षता घेत त्वरीत बुजवण्यात आला आहे. दरम्यान, या ठिकाणी पडलेल्या खडड्यातून पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन, टेलिफोनची वायर गेलेली आहे. पाईप लाईन टाकाताना किवा एक वर्षभरापुर्वी टेलीफोनची वायर टाकताना येथून चर खोदली होती. यावेळी मात्र येथे कोणताही खड्डा तयार झाला नाही. अथवा जमीन भुसभुसीत झालेली दिसून आली नाही. तरी देखील पावसाळ्यापूर्वी येथे भला मोठा खड्डा पडल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT